शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पुसेगावात यंदा फ्लेक्समुक्त यात्रा

By admin | Updated: December 30, 2015 00:47 IST

देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतीचा निर्धार : नेर तलावातील पाणी सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेस येणाऱ्या यात्रेकरुंना योग्यप्रकारे व उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी यात्रेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक विभागाने देवस्थान ट्रस्टशी समन्वय साधत योग्य ते नियोजन करावे, यात्राकालावधीत नेर तलावातील पाणी सोडण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. दरम्यान, पुसेगावची यात्रा फ्लेक्समुक्त करण्याचा निर्धार यावेळी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. ४ ते गुरुवार, दि. १४ जानेवारी २०१६ या कालावधीत यात्रा भरविण्यात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी येथील नारायणगिरी सभागृहात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस उपअधीक्षक एम. राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा परिषद कृषी अधिकारी चांगदेव बागल, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, सुनीलशेठ जाधव, सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच रणधीर जाधव, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी डॉॅॅ. तानाजीराव लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा काळात लाखो भाविकांची हजेरी लावतात. यात्रा काळात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी जादा बंदोबस्त ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन व्यवस्था, नो पार्किंग झोन, मिरवणुकीचा प्लॅन करून वाहतुकीची कोंडी होणार नाही याबाबत पोलीस यंत्रणेने दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या. यात्रेची व्याप्ती पाहता पुसेगाव सुवर्णनगरीमध्ये येणाऱ्या भाविक, यात्रेकरू व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण टाळून शुद्धपाणी पुरवठा करावा, रथमार्गातील सर्व अडथळे दूर करावेत, नेर तलावतून येरळा नदीला पाणी सोडणे, यात्रेपूर्वी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, २४ तास वीज पुरवठा व अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी मुदगल यांनी केले. (वार्ताहर)पोलीस बंदोबस्तात वाढयात्रा कालावधीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी १, पोलीस निरीक्षक १, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक १२, पोलीस कर्मचारी १२३, महिला कर्मचारी २२, वाहतूक शाखेकडील पोलीस ३०, गृहरक्षक पुरुष २००, महिला १००, पाच आर्मगार्ड, पाच टनी १ गाडी, वायरलेस स्टॅटीक १, हॉकीटॉकी १२, मोठा तंबू १, लहान तंबू ५ याशिवाय मुख्य रथादिवशी जादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती पुसेगावचे सहायक पोेलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली. यात्रा कालावधीत वाहतुकीत बदल यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदलण्यात येणार आला असून, वहातुकीची कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याहून दहिवडीकडे जाणाऱ्या गाड्या नेर मार्गे दहिवडी तर वडूज कडून सातारकडे जाणाऱ्या गाड्या विसापूर, खातगुण, जाखणगाव व चौकीचा आंबा मार्गे जाण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय मुख्य रथादिवशी शुक्रवार, दि. ८ व शनिवार, दि. ९ रोजी पुसेगावमध्ये कोणतेही वाहन आत येऊ दिले जाणार नाही. रथमार्गाचे डांबरीकरणसुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची करडी नजरयात्रेकरुंना चोवीस तास मुबलक पाणी, वीजेची व्यवस्था ६ रुग्णवाहिका तसेच आरोग्य विभागाची पाच फिरती पथके८० आरोग्य कर्मचाऱ्यांची यात्रा कालावधीत नेमणूक