शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथवाडीत पुजाऱ्यांकडील पाच नागांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:38 IST

पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील ...

पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील पुजाऱ्यांनी नाग बाळगल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्यांनी रविवारी दुपारी एक वाजता मंदिरात छापा टाकून तिघांकडून पाच नागांची सुटका केली.अजय बजरंग गुरव (वय ४७), विजय बजरंग गुरव (५०) व प्रज्ञा प्रदीप गुरव (३८, तिघे रा. नागनाथवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.नागनाथवाडीमधील मंदिरात अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यातील सोमवारी येणाºया भाविकांच्या हातात नागाची लहान पिल्ली दिली जातात. त्यामुळे भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असा समज होता. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नागाची लहान पिल्ली गाभाºयात सोडली जात होती. त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालून मोठ्या प्रमाणात लूटही केली जात होती. याबाबत कोरेगावमधील सर्पमित्र योगेश धुमाळ व अंनिसचे कार्यकारी संघटक हेमंत जाधव यांनी चार वर्षांपूर्वी आवाज उठवून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. कोरेगाव उपविभागाच्या पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी गतवर्षी प्रथा बंद करण्यासाठी संबंधितांना सूचनाही दिली होती. तरीही त्यांनी ही प्रथा सुरूच ठेवली होती.यावर्षी मात्र श्रावण उत्सव सुरू होण्यापूर्वीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुसेगाव पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही प्रथा तातडीने बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मागील आठवड्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, नागनाथवाडीतील ग्रामस्थांची एकत्रित बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. श्रावणातील पहिल्या व दुसºया सोमवारी ही प्रथा बंद करण्यात आली. मात्र, तिसºया श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येथील पुजाºयांनी पुन्हा गावची प्रथा सुरू करण्याचा प्रयत्न केला.यावर उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वडूजचे वनक्षेत्रपाल अजित साजने, साताºयाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, वन कर्मचारी व पोलिसांनी छापा टाकला. यावेळी नागनाथ मंदिरातील अजय गुरव, विजय गुरव व प्रज्ञा गुरव यांच्याकडे पाच नाग जातीचे लहान सर्प आढळून आले. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.