शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मार्डीत पाच दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: January 25, 2015 00:40 IST

ग्रामस्थांची समयसुचकता : मंदिराशेजारी दबा धरून बसलेल्यांपैकी एक फरार

पळशी : मार्डी येथील भवानी माता मंदिराशेजारी आज, शनिवारी पहाटे पावणेसहाला पाच-सहाजण दबा धरून बसल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी दहिवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत या दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाचजणांना अटक केली. एकजण पोलिसांना गुंगारा देत पळून गेला. त्यांच्याकडून धारदार चाकू व इतर साहित्य जप्त केले आहे. विशाल विलास काळे (वय १९, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, कर्जत, जि. अहमदनगर), योगेश सदाशिव भोसले (१९, रा. करवडी, ता. कर्जत), वंद्या ऊर्फ वंदेक लक्ष्मण शिंदे (४६, रा. विसापूर, ता. खटाव), परशा ऊर्फ प्रशांत मुकेश काळे (२१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव, जि. सांगली), आलिशा ऊर्फ आलिशान डांबिशा काळे (३९, रा. औंध, ता. खटाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्डी येथील शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील भवानी माता मंदिराशेजारी असलेल्या लमाणबाबा मंदिराच्या आडोशाला सहाजण दबा धरून बसले होते. त्यांचा संशय आल्याने ग्रामस्थांनी तत्काळ दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांना याची कल्पना दिली. चवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रात दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कर्मचारी पाठवून दिले. ग्रामस्थ व पोलिसांनी योग्य समन्वय ठेवल्याने अवघ्या दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी मार्डी ग्रामस्थही जमा झाले होते. पोलीस अन् ग्रामस्थ येत असल्याचे पाहून दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे पाठलाग करून तिघांना, तर दोघांना जाग्यावरच पकडले. अतुल ऊर्फ अतल्या नीलगीर शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) हा पळून गेला असून, याचा रात्री उशिरापर्यंत पोलीस शोध घेत होते. अटक केलेल्यांकडे एक सॅक सापडली असून, त्यामध्ये धारदार सुरा, ब्लेड, मोठा सुरा, मोबाईल, कात्री सापडली. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रातील सी. एम. राक्षे, डी. ए. शिंदे, आर. बी. फडतरे, ए. के. चांगण, उमेश कोळी तसेच दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, उपनिरीक्षक एस. बी. कवडे, प्रकाश इंगळे यांनी चोरट्यांना पकडण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. दहिवडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.