शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

साठ गावांसाठी पाच पोलीस पाटील!

By admin | Updated: September 6, 2015 20:37 IST

ढेबेवाडी विभागातील स्थिती : रहिवासी दाखला मिळविण्यासाठी युवकांची धडपड

ढेबेवाडी : साठ गावे, दोनशे वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ढेबेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत एक लाखांवर लोकसंख्येसाठी केवळ पाच पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलीस पाटलांची सुमारे पन्नास पदे रिक्त असल्याने शासकीय कामी आवश्यक असणारा पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला सामान्यांना मिळत नाही. परिणामी, नोकर भरतीत इच्छुकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, कागदपत्रांतील पोलीस पाटलांच्या रहिवासी दाखल्याची अट रद्द करा, अथवा पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी होत आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात काळगाव आणि मंद्रुळकोळे असे दोन जिल्हा परिषद गट आहेत. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त अशा नैसर्गिक संकटांनी गुरफटलेल्या येथील जनतेला नेहमीच विविध अडचणींचा सामना करावा लागतो. धरणग्रस्त, डोंगरी आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना आता शासकीय नोकरीतही शासनाने आरक्षण जाहीर केल्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच इच्छुक नोकरीसाठी धावाधाव करतानाचे चित्र आहे. शासकीय नोकरीसाठी संबंधितांच्या शैक्षणिक पात्रतेसह सरपंच, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील आदींचे रहिवासी दाखले आवश्यक केले आहेत. ढेबेवाडी विभागातील इच्छुकांना सरपंच, तलाठी यांचे दाखले उपलब्ध होत आहेत. मात्र गावे साठ आणि पोलीस पाटील पाच अशी अवस्था असल्याने पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला मिळविताना मोठी कसरत होऊ लागली आहे. दरम्यान, पोलिसांचा खबऱ्या म्हणून ओळख असलेला गावोगावचा पोलीस पाटीलच पोलिसांपासून दुरावल्याने पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या काढणे गावापासून वाल्मिकी पठारावरील कसणी-धनगरवाड्यापर्यंत सुमारे चाळीस किलोमीटर अंतरात एकही पोलीस पाटील कार्यरत नाही. परिणामी, पोलिसांचा या गावांशी संपर्कच तुटल्याने पोलिसांचीही मोठी दमछाक होत आहे. मुळातच लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प पोलीस कर्मचारी आणि त्यातच पोलीस पाटलांची सुमारे ५० पदे रिक्त असल्याने गावोगावी संपर्क साधताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर) वरिष्ठांकडे पाठपुरावा...याबाबत पाटण प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता, या वस्तुस्थितीचे समर्थन केले. तसेच पोलीस पाटलांच्या रिक्त पदाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा चालू असून, लवकरच या पदांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. .कुणीतरी दाखले द्यावे ! या विभागात आता तरुणांमध्ये पोलीस आणि सैन्यदलाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अ‍ॅकॅडमीचीही साथ त्यांना मिळाल्याने तरुणांची पावले पोलीस-सैन्यदलाकडे वळू लागली आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गोळाबेरीज करताना दमछाक होऊ लागली असतानाच पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला मिळत नसल्याने तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे.