शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखान्याच्या तत्कालिन अधिकाºयासह पाचजणांना कैद--सहा वर्षांपूर्वीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:52 IST

कºहाड : ऊसतोडणी वाहतूकदारांना कोंडून ठेवल्याप्रकरणी कृष्णा कारखान्याच्या तत्कालीन कृषी अधिकाºयासह पाचजणांना एक वर्ष कैदेची शिक्षा

ठळक मुद्देकºहाड : ऊसतोडणी वाहतूकदारांना कोंडून ठेवल्याप्रकरणी कृष्णा कारखान्याच्या तत्कालीन कृषी अधिकाºयासह पाचजणांना एक वर्ष कैदेची शिक्षा तपासाअंती तळेकर त्यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादरकेले होते

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ऊसतोडणी वाहतूकदारांना कोंडून ठेवल्याप्रकरणी कृष्णा कारखान्याच्या तत्कालीन कृषी अधिकाºयासह पाचजणांना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या. आर. टी. घोगले यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली.कृषी अधिकारी सुजय विलासराव पवार (रा. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड), जयवंत तातोबा थोरात (रा. साळशिरंबे, ता. कºहाड), बाबासाहेब दिनकर पाटील रा. नांदगाव, ता. कºहाड), जुबेर आलम मुल्ला (रा. म्हासोली, ता. कºहाड), सुपरवायझर उमाजी बाबूराव सूर्यवंशी (रा. शेवाळेवाडी, ता. कºहाड) अशीशिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. किशोर दिनकर डांगे (रा. वाघेरी, ता. कºहाड) यांनी डिसेंबर २०११ मध्ये याबाबतची फिर्याद कºहाड तालुका पोलिसांत दिली होती.

वाघेरी येथील किशोर डांगे यांचा ट्रक आहे. हा ट्रक किशोर यांचे मित्र संजय पिसोत्रे (रा. कर्नाटक) यांनी २०११-१२ च्या गळीत हंगामात कृष्णा कारखान्याला ऊस वाहतूक व तोडणी मजुरीसाठी लावला होता. त्याबाबतचा साडेचार लाखांचा करार त्यांनीकृष्णा कारखान्याशी केलाहोता.त्यानंतर कराराची रक्कम वसूल न झाल्यामुळे कारखान्याचा तत्कालीन कृषी अधिकारी सुजय पवार याने ट्रकमालक किशोर डांगे यांना बोलावून घेतले. त्याने डांगे यांना कराराची रक्कम भरण्यास सांगितले. त्यावेळी पैसे नसल्यामुळे डांगे यांनी पैसे भरण्यास मुदत मागितली. मात्र,सुजय पवार याने वॉचमन जयवंत थोरात, बाबासाहेब पाटील, जुबेर मुल्ला, सुपरवायझर उमाजीसूर्यवंशी यांना बोलावून घेऊन डांगे यांच्यासह इतर पाच ते सहा ऊस वाहतूकदार व कंत्राटदारांना कारखान्यावर तसेच ओंड येथील गट कार्यालयात कोंडून ठेवले. १३ ते २७ डिसेंबर २०११ या कालावधीत हा प्रकार घडला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलिसांनी किशोर डांगे यांच्यासह इतर वाहतूकदार व कंत्राटदारांची सुटका केली. तसेच किशोर डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक तळेकर यांनी केला. तपासाअंती तळेकर त्यांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादरकेले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ना. बी. गुंडे यांनी काम पाहिले. यावेळीअकरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्यमानून न्या. घोगले यांनी पाचही आरोपींना एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली.तीन कलमांमध्ये शिक्षापाचही आरोपींना न्यायालयाने दोषी धरून कोंडून ठेवल्याप्रकरणी ३ महिने, दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस कोंडून ठेवल्याप्रकरणी ६ महिने व प्रत्येकी पाचशे रुपये दंड तसेच गुप्त ठिकाणी कोंडून ठेवल्याबद्दल एक वर्ष कैदेची शिक्षा सुनावली.