शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांसाठी एसटीचे पाच लाख जमा!

By admin | Updated: April 24, 2016 23:42 IST

सहाय्यता निधी : कऱ्हाड आगाराची कामगिरी; मृतांचे वारस तसेच जखमींना मिळणार तत्काळ मदत...

कऱ्हाड : लाखो प्रवाशांना आरामदायी प्रवासासह बळकट सुरक्षा देण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एक म्हणजे, अपघातग्रस्तांच्या आर्थिक सहाय्यता निधीत वाढ केली आहे. यानुसार १ एप्रिलपासून प्रत्येक प्रवाशांकडून वाढीव एक रुपया घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयानुसार कऱ्हाड आगार प्रशासनाने १ तारखेपासून २३ तारखेपर्यंत ५ लाख ५०० रुपये एकत्रित केले आहे. परिवहन विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार एस.टी.च्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या कऱ्हाड आगारात आतापर्यंत एकाही एसटीचा अपघात झाला नसला तरी अपघातग्रस्तांसाठी आगार प्रशासनाने तब्बल पाच लाख पाचशे रुपये गोळा केले आहेत.कऱ्हाड आगारातून दररोज ९८ बसगाड्या ग्रामीण भागात हजारो प्रवासी घेऊन धावतात. त्यानुसार निर्णयाच्या अंमलबजावणीपासून २३ दिवसांत पाच लाख पाचशे प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यांच्याकडून पाच लाख पाचशे रुपये ऐवढे एक-एक रुपयाने पैसे गोळा झाले आहेत. एस. टी. महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार प्रवासी मृत्यूस दहा लाख रुपये, कायमच्या अपंगत्वास पाच लाख तर गंभीर जखमीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. या मदतीसाठी प्रत्येक प्रवाशांकडून दररोज एक रुपया जास्त आकारले जात आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातून चोवीस दिवसांत तब्बल पाच लाख पाचशे रुपये कऱ्हाड आगारास प्राप्त झाले आहेत. तो प्रवासी अपघातग्रस्त आर्थिक सहाय्यता निधी म्हणून जमा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रवाशांचा पैसा प्रवाशांसाठीप्रत्येक दिवशी एक-एक रूपया जमा केल्यास किती रुपये एकत्र केले जातील याचे उत्तम उदाहरण एस. टी. महामंडळ प्रशासनाने यातून दिले आहे. सलग २३ दिवस एक-एक रुपया एकत्र करत पाच लाख पाचशे रूपये आगाराने जमा केले आहेत. ते पैसे अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहेत.