शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कास धरण उंचीमुळे पाचपट पाणी

By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST

उदयनराजे : साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन

सातारा : ‘कास धरणाची उंची वाढविल्यानंतर शहराला पाचपट पाणी उपलब्ध होईल. तसेच कण्हेर योजनेमुळे शहर परिसरातील १८ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. राज्यात शासन कोणाचेही असले तरी लोकहिताची कामे मार्गी लागतील,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.कास येथील साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपाध्यक्षा दिनाज शेख, अतिरिक्त मुख्याधिकारी अशोक लोकरे यावेळी उपस्थित होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘निधी उपलब्धतेच्या दिरंगाईमुळे सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प मार्गी लागण्यास उशीर झाला. याची जाणीव आहे. मात्र, प्राधिकरणाने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. गुळगुळीत रस्ते खोदलेले पाहताना मनाला बरं वाटत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामांपूर्वी पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली पाहिजेत.’‘पाट बंदिस्तीकरणामुळे शहराला जादा पाणी उपलब्ध झाले आहे. प्राधिकरण व पालिका अधिकाऱ्यांनी या पाण्याच्या वितरणाचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल. यासाठी प्रयत्नशील राहावे,’ अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी पालिका पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जादा वीस लाख लिटर पाणी मिळणार चार कोटी ८५ लाख रुपये खर्चून साडेसहा किलोमीटरचा पाट बंदिस्त करण्यात आला आहे. या कामामुळे रोज वाया जाणारे सुमारे वीस लाख लिटर पाणी सातारकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी दिली.