शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावांच्या पाणी योजनांसाठी पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सहा गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ ...

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील सहा गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित गावांनी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यासाठी गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. लोकप्रतिनिधींनाही याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आले होते. अखेर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित गावांची गरज लक्षात घेऊन पाणी योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पुण्याच्या मुख्य अभियंत्यांकडून संबंधित सहा गावांच्या पाणी योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली होती. ही कामे कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. त्यानुसार, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा केला आणि सहा गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत घोगाव गावासाठी ९५ लाख ४६ हजार, बामणवाडीला १ कोटी १४ लाख ९६ हजार, भुरभुशीला ३८ लाख ८५ हजार, येवतीला १ कोटी १८ लाख ६ हजार, साळशिरंबेला ३७ लाख ४४ हजार, कोळेवाडीला ८५ लाख ४० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, कामाची निविदा निघाल्यानंतर ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.