शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांत प्रथमच आंब्याचे दर स्थिर

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

साताऱ्यातील स्थिती : एप्रिल, मे, जूनमध्ये घसरण नाही; पुढील महिन्यात आंब्याला निरोप

सातारा : झाडांना मोहर बहरला असला तरी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात मोहर झडला असल्याने यंदा बाजारात मागणी पेक्षा कमी उत्पादन झाले. त्याचा परिणाम मागील वर्षाच्या कालखंडात प्रथमच अंब्यांचा दर संपूर्ण हंगाम टिकून राहिला असून, पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यातच आंबा बाजारातून निरोप घेईल, असे मत व्यापारी वर्गातून होऊ लागले आहे. कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून येणारा हापूस, पायरी, केशर आणि तोतापुरी आंब्यांचे यंदा २५ ते ३० टक्केच उत्पादन झाले असल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे उपलब्ध आंब्याचे दर संपूर्ण हंगाम स्थिरावला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हापूस ६०० रुपये ४ डझनची पेटी दर स्थिरावून आहे. तर पायरी, केशर, नीलम, तोतापुरी यांची डझनाचे बॉक्स साधारणत: १५० ते ३०० रुपये विक्रमी जात आहे. यांचेही दर कमी न झाल्याने यंदा गरिबांपासून कोसो दूर आंबा राहिला आहे. सातारा तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेला आंबाही यंदा चांगलाच भाव खाऊन गेला. साडे तीनशे रूपये डझनपासून सुरू झालेला हा दर आता शंभर रूपयांवर येवून थांबला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाटी आणि कॅरेटमध्ये आंबे घेवून ते पोवईनाका, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरन्ट, बसस्थानक या शहरातील मोक्याच्या ठिकाणी विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढली होती. मुक्कामी गाडीने साताऱ्यात यायचे आणि आंबे विकुन झाले की दहा अकरापर्यंत पुन्हा गावी जाण्याचे या शेतकऱ्यांची दिनचर्या झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी यंदा आंब्याच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. यंदा कमी पाऊस, अवकाळी पावसाची कमतरता आणि मोहर लागले, त्यावेळी पोषक वातावरण नसल्याने आंब्याच्या उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पेट्यांची जागा बॉक्सने घेतली कोकणमधून येणारा हापूस आंबा हा शक्यतो लाकडी पेटीतून ६ डझन भरून येतो; परंतु यंदा दर वाढल्याने पेटी खरेदीकडे फारसे ग्राहक येत नसल्याचे पाहून कोकणातील शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना म्हणून १ डझनाचे बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले. याला ग्राहकांकडूनही मागणी आहे. मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत आंब्याचा हंगाम सुरू होता; परंतु यंदा आंबा उत्पादनात कमालीची घट झाली असून, मागणीपेक्षा कमी आंबा असल्याने दरही स्थिरावले आहेत. परिणामी यंदा हा हंगाम जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल, अशी परिस्थिती बाजारपेठेत दिसत आहे. -इरफान बागवान, घाऊक व्यापारी