शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाहिलेले देशातील पहिले साहित्य संमेलन

By admin | Updated: December 3, 2015 23:50 IST

आज शाहू कला मंदिरात : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रथमच साताऱ्यात

सातारा : राज्यात निर्माण झालेली दुष्काळस्थिती आणि वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या विषयावर विचारमंथन व्हावे, यासाठीच कृषिजागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विषयाला वाहिलेले हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलेच संमेलन ठरणार आहे, अशी माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे यानिमित्तानं पहिल्यांदाच साताऱ्यात येत आहेत.माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे दुसरे कृषिजागर सातारा येथे ४ व ५ डिसेंबर रोजी होत आहे. हे साहित्य संमेलन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना समर्पित केले आहे. दोन दिवसीय या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, शिवारातील कविता असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाध्यक्षापदाची धुरा प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी स्वीकारले आहे. राज्यातील शंभरहून अधिक साहित्यिक या संमेलनाला हजेरी लावणार आहेत.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरात साहित्यिक चळवळ रुजवण्यात साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने मोलाचे योगदान दिले आहे. या शाखेतर्फे स्थापनेपासून मराठी भाषा पंधरवडा, विभागीय साहित्य संमेलन, सातारा साहित्य संमेलन यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या कार्याला मदतनिधी देण्याचा वेगळा पायंडा शाहूपुरी शाखेने पाडला आहे. या कार्यात जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, शाहूपुरी शाखेचे किशोर बेडकिहाळ, नंदकुमार सावंत यांचा मोठा वाटा आहे. (प्रतिनिधी)