शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

दिवाळीची पहिली पहाट सुमधूर सुरात : सातारकर रसिकांनी मराठी-हिंदी गाण्यावर धरला ठेका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:00 IST

राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली.

ठळक मुद्देगांधी मैदानात संगीत मैफील या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि

सातारा : राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली. यावेळी रसिक सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाण्यांचा आनंद लुटला.

गेली १३ वर्षे सर्व सातारकरांसाठी ऐन दिवाळीत ही अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी दरवर्षीच हजारो सातारकर गांधी मैदानात हजर असतात. मंगळवारी भल्या पहाटेच या कार्यक्रमासाठी सातारकर मोठ्या उत्साहात उपस्थित होते. ‘केव्हातरी पहाटे’ या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करणाऱ्या ‘तू बुद्धी दे’ या मराठी गीताने गायिका पौर्णिमा व सहकलाकारांनी करत त्यानंतर गीताने गायलेली ‘माझ्या घरी दिवाळी’ हे दिवाळीगीत सादर होऊन कार्यक्रमाचे शीर्षक गीत असलेल्या ‘केव्हातरी पहाटे’ या गाण्याला पुन्हा गायिका पौर्णिमा भावसारने साज चढवला. साताºयाचे स्थानिक सुप्रसिद्ध गायक राजेंद्र घोणे यांच्या ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि हा रंगलेला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला.

कार्यक्रमामध्ये गायनसाथ पौर्णिमा भावसार, गीता बोधे-भस्मे, राजन घोणे, चंद्र्रकांत शिंदे, मधुराणी मोकल, संतोष वाघ, विवेक जाधव यांची होती तर वादनासाठी सिंथेसायजरवर दीपक सोनावणे, ड्रमसाथ धनंजय कान्हेरे, ढोलकसाथ अनिल खैरनार, तबलासाथ शांताराम दयाळ, गिटारवर चंदू पुट्टा, अ‍ॅटोपॅड साथ रोहन मोकल यांची होती. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळ प्रकाश गवळी, निशांत पाटील, गुरुप्रसाद सारडा, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, सलीम कच्छी, दिलीप गवळी, नरेंद्र पाटील व सातारकर उपस्थित होते.चालक-वाहकांना अभ्यंगस्नानसातारा मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी बाहेर विभागातून मुक्कामी गाडी घेऊन आलेल्या चालक-वाहकांसाठी अभ्यंगस्रानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उठण, साबन देण्यात आली होती. तसेच फराळाचीही सोय केली होती. चालक-वाहक एकमेकांना अंघोळ घालत होते. आपण कुटुंबापासून दूर असल्याची भावना होऊ नये, यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो.