शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केबल वॉरमधून मिरजेत गोळीबार

By admin | Updated: February 27, 2015 00:16 IST

महापालिकेत पळापळ : एक जखमी; चौघांवर गुन्हा

मिरज : मिरजेत महापालिकेच्या आवारात शिवसेना उपतालुकाप्रमुख विशालसिंग रामसिंग रजपूत याने आज (गुरुवारी) रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून दहशत निर्माण केली. विशालसिंग व किरणसिंग रजपूत बंधूंनी केलेल्या मारहाणीत प्रवीण सुनील देसाई जखमी झाला. केबल व्यवसायाच्या वादातून दोन गटात झालेली हाणामारी व गोळीबाराच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी विशाल रजपूत (वय ४२) व किरण रजपूत (४२, रा. दोघेही मंगळवार पेठ, मिरज) हे दोघे भाऊ महापालिकेत सुशिला देसाई यांच्या दारू दुकानाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यासाठी आले होते. याचवेळी तेथे आलेले बालाजी केबलचे संजय देसाई (३४), प्रवीण देसाई (३४, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) या बंधूंशी बाचाबाची झाली. रागाच्या भरात विशालने रिव्हॉल्व्हर झाडून प्रवीणवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेले समीर सय्यद, संजय देसाई, महिला पोलीस शिपाई मुडे यांनी त्यास रोखले. विशालने हवेत व जमिनीवर दोन फैरी झाडल्या. विशालचा भाऊ किरणने हातातील जाड चांदीचे कडे काढून प्रवीणच्या डोक्यात मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. महापालिका आवारात झालेल्या गोळीबाराचे वृत्त शहरात पसरले. पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे व पथक घटनास्थळी धावले. त्यांनी विशाल रजपूतला रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले. संजय देसाई यांनी महापालिका कार्यालयात वृत्त संकलनासाठी आलो असता, केबल न्यूजवर विरोधात वृत्त दिल्याच्या रागातून विशाल रजपूतने गोळीबार करून व किरण रजपूतने प्रवीण यास मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. विशाल रजपूतने पूर्ववैमनस्यातून संजय व प्रवीण देसाई यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)