शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फटाका वाजला तरी वाटतंय झाला गोळीबार!--नागरिक तणावाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:04 IST

सातारा : दिवाळी तोंडावर आली आहे. या परिस्थितीत कोजागिरीलाच शुक्रवारी मध्यरात्री बंदुकीतून फटाक...फटाक असे आवाज आले.

ठळक मुद्दे : जलमंदिर, सुरुचीच्या परिसरातील नागरिकांची तारांबळतणाव आहे पण तो दाखवून न देण्याचे कसब या नागरिकांनी बाळगले

सातारा : दिवाळी तोंडावर आली आहे. या परिस्थितीत कोजागिरीलाच शुक्रवारी मध्यरात्री बंदुकीतून फटाक...फटाक असे आवाज आले. कोजागिरीमुळे चंद्राच्या साक्षीने दूध आटविण्यात लोक गुंतले असतानाच या आवाजाच्या दिशेने सर्वजण धावले. पाहतायत तर सुरुची बंगल्यासमोर पोलिसांसह लोकांची मोठी गर्दी झालेली. मात्र, बंदुकीच्या गोळीचा हा आवाज असल्याचे समजताच येथील सरळमार्गी लोक घरात जाऊन बसले. असे शुक्रवार पेठेतील नागरिक सांगत होते.

येथील नागरिकांशी चर्चा करत असताना ते तणावाखाली आहेत, हे जाणवत होतं. दिनक्रम सुरूच ठेवावा लागतो, त्यामुळे तणावाखाली असले तरी लोक त्यांच्या कामांत व्यस्त होते. सातारा शहरात नेहमीच रात्रीच्या वेळी फटाके फोडण्याची हौस काही मंडळी भागवत असतात. विशेषत: रात्री चौकात वाढदिवसाचा केक कापून फटाक्यांचा धडाका उडवून देण्याचा प्रकार साताºयात वारंवार सुरू असतो. मात्र, शुक्रवार पेठेत अनेक दिवसांपासून असले प्रकार बंद झाल्याचे नागरिक सांगतात.

लोक नाव न घेण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलते झाले. तणाव आहे पण तो दाखवून न देण्याचे कसब या नागरिकांनी बाळगले आहे. ‘मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि दवाखान्यात आपल्या नातलगाला जेवणाचा डबा द्यायचा आहे,’ अशा अनेक दैनंदिन गोष्टी करायच्या असतात. मात्र, कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री घडलेल्या घटनेनंतर सुरुची बंगल्यापासून मोती तळ्यापर्यंत तसेच गोराराम मंदिरापर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, पोलिसांनी संचारबंदी केलेली आहे. तणाव काहीच नाही. तरीही पोलिसांनी हे रस्ते बंद केलेत, असं या नागरिकांचे म्हणणे आहे. शुक्रवार पेठेतून अनंत इंग्लिश स्कूल अथवा मंगळवार तळे, राजवाडा मंडईत जायचे झाले तरी वाहन नेता येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी चालतच जावे लागत आहे.

जागोजागी पोलिस अडवत असल्याने स्थानिक नागरिकांची भलतीच कोंडी झालेली आहे.दिवाळी सुखरूप साजरी होणार का? या प्रश्नावर ‘जो तो आपल्या कुवतीप्रमाणे ती साजरी करत असतो. कर्ज काढू पण दिवाळी साजरी करू, अशी मानसिकता असते. त्यामुळे दिवाळी तर साजरी होणारच आणि फटाकेही फुटणार,’असे एका नागरिकाने सांगितले.दिवाळीची बंदूक आहे...शुक्रवार पेठेतील रस्त्यावर कोजागिरीदिवशी बंदुकीचे बार वाजले होते. आता दिवाळीत फटाके फोडण्यासाठी एक छोटा खेळण्यातील बंदूक घेऊन जाताना पाहायला मिळाला.