शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘जरंडेश्वर’च्या बगॅसला आग

By admin | Updated: May 28, 2015 01:01 IST

दोन कोटींचे नुकसान : पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घडली घटना

कोरेगाव : चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या आवारातील बगॅस डेपोमध्ये असलेल्या पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. शुगर मिल्ससह जिल्ह्यातील अग्निशामक दलांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत सुमारे ११ हजार टन बगॅस जळाला असून, त्याची किंमत २ कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कारखान्याच्या उत्तर दिशेला बगॅसचा मोठा डेपो आहे. या डेपोतून बुधवारी दुपारी बगॅस इतर वाहनांमध्ये पॉकलेनद्वारे भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानकच पॉकलेनमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि त्याला आग लागली.कारखाना व्यवस्थापनाने तातडीने जिल्ह्यातील किसन वीर व अजिंक्यतारा सहकारी कारखाना आणि सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब बोलावून घेतले. या बंबांनी युध्दपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बगॅसच्या ढिगाऱ्यात खाली दहा फुटांपर्यंत आग धुमसत असल्याने ती आटोक्यात आणणे मुश्किल बनले होते. पॉकलेन हा खासगी ठेकेदाराच्या मालकाचा असून, त्याचे निश्चित किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस कर्मचारी नीलेश येवले, महेंद्र पाटोळे व चालक आळंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला असून, त्यामध्ये सुमारे ११ हजार टन बगॅस जळाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. चालू बाजारभावाप्रमाणे जळालेल्या बगॅसची किंमत सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकलीबगॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने क्षणार्धात डेपोला आगीने वेढले. आगीचे लोट आणि काळा धूर दिसू लागल्यानंतर कारखान्याच्या सुरक्षा विभागाने तातडीने अग्निशामक बंबाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग पसरत गेली.