शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

हातपंपावर पाणी हापसून विझविली आग

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

व्यापारी अन् युवकांच्या एकीचे दर्शन : पाचवडला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन फर्निचर दुकाने भस्मसात; ८ ते १० लाखांचे नुकसान

पाचवड : पाचवडच्या मुख्य बाजारपेठेतील दोन फर्निचर दुकाने शॉर्टसर्किटमुळे लागेल्या आगीत खाक झाली. गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे बाजारपेठेतील सर्व व्यापारी व युवकांमध्ये असणारी एकी दिसून आली. फर्निचर दुकानाला आग लागल्याचे पाहून बाजारपेठेतील व्यापारी व सुमारे शंभरहून अधिक युवक एकत्र आले. अग्निशमन दलाची वाट न पाहता दुकानासमोरील हातपंपावर पाणी हापसून बादली व हांडे भरून सर्वजण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. ही एकी पाहून अनेकजण भावुक झाले. पाचवडच्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या कृष्णाई व कृष्णामाई या फर्निचर दुकानांना शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. गुरुवारी रात्री ९.४५ च्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील सुमारे ८ ते १० लाखांचा माल जळून खाक झाला. लाकडी व प्लायवूडचे टेबल, कपाटे, सोफासेट, गाद्या तसेच प्लास्टिकचे फर्निचर आदी साहित्य असलेल्या या दुकानाने क्षणात मोठा पेट घेतल्याने बाजारपेठेत हाहाकार उडाला. उंचच्याउंच ज्वाळा दुकानाबाहेर आग ओकत असल्याने शेजारील इतर दुकानदारांचेही चांगलेच धाबे दणाणले. अशा बिकट परिस्थितीत शेजारील दुकानांचे संरक्षण करण्यासाठी सर्व व्यापारी तसेच पाचवडच्या युवकांनी एकत्र येऊन अग्निशमन दलाची वाट न पाहता दुकानासमोरच असणाऱ्या पाण्याच्या हातपंपावरून पाणी आणून दुकानावर पाण्याचा मारा करून आग इतरत्र पसरू न दिल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच भुर्इंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दल पाचारण करून संपूर्ण आग आटोक्यात आणली. संतोष सदाशिव पार्टे व त्यांचे बंधू रामदास पार्टे या दोघांच्या मालकीचे कृष्णाई व कृष्णामाई फर्निचर ही दोन्ही दुकाने एकमेकाला लागून पाचवडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहेत. गुरुवारी दिवसभराचे काम संपवून दोघेही सुमारे ९.३० वाजता आपली दुकाने बंद करून दुकानाच्या पाठीमागेच आपल्या निवासस्थानी गेले. त्यानंतर काही वेळाने दुकानात धूर येऊ लागल्याने त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानगाळ्यांचे शटर उघडेपर्यंत आतील बहुतांशी साहित्याने पेट घेण्यास सुरुवात केली होती. आजूबाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांनी व स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्यापरीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु प्लास्टिक व प्लायवूडच्या साहित्याने पेट घेऊन आगीचा भडका मोठा झाल्याने या सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले.दरम्यान, काही ग्रामस्थांनी भुर्इंज पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून भुर्इंज पोलिस ठाण्याचे संपूर्ण पोलिस दल तसेच आपत्कालीन पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर आगीचे रौद्ररूप पाहून सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार यांनी घटनास्थळापासून जवळचे असणारे किसन वीर कारखान्याचे अग्निशमन दल प्रथम पाचारण करून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातारा नगरपालिकेचे अग्निशमन दल व महाबळेश्वर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने संपूर्ण आटोक्यात आणली.या घटनेमुळे पार्टे कुटुंबीयांची मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी तहसीलदार अतुल म्हेत्रे आपल्या महसूल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)महावितरणचा कारभार चव्हाट्यावरपाचवड या मुख्य बाजारपेठेत गेल्या तीन वर्षांत वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किटच्या तीन घटना घडल्या असून, यामुळे महावितरणच्या शाखा अभियंता व त्यांच्या सहकार्यांचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस अगोदरच ‘लोकमत’ने बाजारपेठेतील चपला-बुटांचे दुकान, हॉटेल्स, मोबाईल शॉप्स तसेच बाजारपेठेतील घरांमधील इलेक्ट्रॉनिकचे बरेचसे साहित्य वीजेच्या उच्चदाबामुळे जळून खाक झाले असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु ही घटना महावितरणच्या पाचवड शाखेने गांभीर्याने न घेतल्याने आजची ही घटना घडली का? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. ...अन् मोठा अनर्थ टळलाआपल्या मित्राच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच पाचवडचे सरपंच महेश गायकवाड जेवत्या ताटावरून उठून मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. जमलेल्या व्यापारी व युवकांना सोबत घेऊन आग अटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाबरोबरच त्यांनी पेट घेतलेल्या दुकानातील घातक सिलिंडर जीवावर उदावर होऊन घटनास्थळापासून दूर नेऊन फेकल्याने बाजारपेठेतील मोठा अनर्थ टळला.