शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात आगीचा डोंब

By admin | Updated: November 15, 2015 01:03 IST

पाचगणीत दुकान खाक : तीन दुकानांनाही झळ

पाचगणी : ऐन दिवाळीमध्ये जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही आगडोंब उसळला असून, पाचगणी येथील भाजी मंडईतील एका दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. याची झळ बाजूच्या तीन दुकानांना बसली असून, यात सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन अग्निशमन बंब व एक खासगी टँकर आग विझविण्यासाठी तीन तास प्रयत्न करीत होते. पाचगणी पालिका हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भाजी मंडईतील एका दुकानाला आग लागल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. प्रत्यक्षदर्शीने याची माहिती पोलीस ठाणे व शेजारील लोकांना दिली. त्यानंतर तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी, पाचगणी व महाबळेश्वर पालिकांचे अग्निशमन बंब, अजय बोरा यांचा पाण्याचा टँकर दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दिनकर रामचंद्र शिंदे यांचे तीन हजार रुपये, दीपक अनंत कासुर्डे यांचे ४५ हजार ८०० रुपये, बबन दिनकर शिंदे यांचे ३९ हजार ४०० रुपये, अल्ताफ इस्माईल बागवान यांचे दुचाकीसह ७९ हजार ९०० रुपये, संजय हरिभाऊ राजपुरे यांचे ९० हजार ५०० रुपये, गणेश बाबूराव वाडकर यांचे ४९ हजार रुपये, संतोष हरिभाऊ राजपुरे यांचे २९ हजार १०० रुपये, बाळकृष्ण आनंदा कासुर्डे यांचे १४ हजार ५०० रुपये असे सुमारे तीन लाख ५१ हजार दोनशे रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत. दरम्यान, नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर व नगरसेवक आणि मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी पाहणी केली व जळीतग्रस्त भाजी विक्रेत्यांना दिलासा दिला. (प्रतिनिधी) सर्व सामान खाक ! आगीत सर्व भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला, भाजीचे कॅरेट, वजनकाटे, साहित्य, फर्निचर, पत्रा शेड, लाकडी बाकडे व इतर साहित्य जळून खाक झाले. अल्ताफ बागवान यांची दुचाकी (एमएच ११ पी २८४३) जळाल्याने १५ हजारांचे नुकसान झाले.