शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अंधाच्या बोटांतून उमटले सप्तसुरांचे तराणे!

By admin | Updated: October 15, 2015 00:32 IST

प्रेरणादायी जगणं : नाटोशी येथील अंध अरविंद पवार यांना लाभलंय विविध कलांचं देणं--अंध सहायता दिन विशेष

प्रवीण जाधव -- नाटोशी अवयवांची विकलांगता असून त्याचा बाऊ न करता आनंदी आयुष्य जगणारी अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आहेत की जी समाजमनाला कणखर बनवितात. जगण्याची दृष्टी देत असतात. आंब्रग येथील अंध अरविंद पवार याचं जगणंही प्रेरणादायी ठरावं असंच आहे. दृष्टी नसूनही ते तबला, पेटी, बेन्जो, बासरी ही वाद्ये एवढी उत्तम वाजवितात. त्यांच्या जादूई बोटांतून जणू सप्तसुरांचे गाणे उमटते. आपल्याकडे जे नाही त्याची तार छेडत बसण्यापेक्षा आयुष्याचं जीवनगाणं बनविण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी अशीच आहे.पाटण तालुक्यातील आंब्रग हे छोटसं गाव. या गावात अरविंद महादेव पवार हे आपल्या कुटुंबासह राहतात. अरविंद जन्मताच अंध. अरविंदची पत्नी दुर्गा हीदेखील जन्मजात सत्तर टक्के अंध आहे़ घरी आई, वडील, दोन मुली आहेत़ पोटापुरता जमीनजुमला़ कष्टाची भाकर खाऊन हे कुटुंब सुखानं जगतंय. अरविंदचं आंब्रग येथे छोटसं दुकान आहे़ तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. एक खास गोष्ट अशी की, तो अंध असूनही मोबाईल रिचार्ज करतो़ तुम्ही तुमचा नंबर सांगायचा वैशिष्ट्य असे की, आजपर्यंत कोणाचाही नंबर चुकलेला नाही़ याशिवाय अरविंदला अनेक कला अवगत आहेत़ टोपल्या वळणे, दोऱ्या वळणे हासुध्दा व्यवसाय तो पोटासाठी करतो़ त्याने बनविलेल्या टोपल्या, दोऱ्यांची वीण अतिशय वेगळी असते. त्यांची ही कला ही खरोखर दृष्ट लागण्यासारखी आहे़ अंध माणसांना येणाऱ्या अडीअडचणी तो जाणतो. आपल्यासारखीच इतरांची अवस्था नको़ अंध, अपंग व्यक्तींनी दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये, ही त्यांची अपेक्षा त्यामुळे त्याने संतकृपा सामाजिक सेवा संस्था स्थापन केली आहे़ या संस्थेच्या माध्यतातून अंध, अपंगाना मदत करण्याचे काम तो करीत आहे़ आंब्रग, नाटोशी, मोरगिरी, बेलवडे शिरळमारूल आदी ठिकाणी त्याने आजपर्यंत 20 नेत्र तपासणी शिबिर घेतली आहेत़ उदरनिर्वाहाचे साधन जळाले; पण कुणी नाही पाहिले!एकंदरीत अरविंदचा संसार व्यवस्थित चालला होता; पण ‘दैव जाणिले कुणी’ या उक्तीप्रमाणे ४ आॅक्टोबर रोजी पहाटे त्यांच्या दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यामध्ये फ्रिज, पंखा व इतर साहित्यासह सुमारे तीस हजार रूपयांचे नुकासान झाले. बातमी प्रसिद्ध झाली. पंचनामा झाला; पण शासकीय मदत काहीच नाही़ प्रशासकीय अधिकारी आणि तालुक्यातील नेतेमंडळींनी भेट देण्याची औपचारिकताही दाखविली नाही. आधार सेवा संस्थेने मदतीचे आश्वासन दिले आहे़