शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या खात्यात राज्य शासनाची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृत रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृत रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रिक्षाचालकांना आर्थिक लाभ मिळू लागला. काही जणांच्या मात्र आज बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अजूनही मदत मिळताना अडचणी येत आहे.

कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. परवानाधारकांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

याबाबत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करताना परवानाधारकांनी अनुज्ञप्ती क्रमांक, वाहन क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरणे आवश्यक आहे. एकूण ५७२९ इतके अधिकृत परवानाधारक रिक्षाचालक असून त्यापैकी ४ जूनअखेर १०३४ परवानाधारकांनी सादर केलेले अर्जाचा निपटारा करण्यात आलेला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा परवानाधारकांनी आपले बँक खाते व मोबाईल क्रमांक आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

कोट

पोस्ट खात्यामार्फत सातारा जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांमध्ये एकूण ४८ ठिकाणी आधार संलग्न सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विनोद चव्हाण,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

कोट..

बँक खात्याला आधारकार्ड लिंक असल्याशिवाय शासनाची मदत मिळू शकत नाही. माझे आधारकार्ड लिंक झाले आहे आता आठ दिवसांनंतर माझ्या खात्यात पैसे येतील, असे प्रशासनाने सांगितले आहे.

- सुनील प्रभाळे, रिक्षाचालक

आधारलिंक करण्यासाठी रांग

अनेक रिक्षाचालकांचे आधार हे बँक खात्याला जोडलेले नसल्याने त्यांना शासनाची मदत मिळू शकत नाही. आता मदत मिळेल या आशेने बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी लोक पोस्ट कार्यालय, आरटीओ ऑफिस या ठिकाणी रांगा लावत आहेत.