शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिकेला खड्डे दिसले...

By admin | Updated: June 14, 2015 00:01 IST

‘लोकमत’चा दणका : महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू

सांगली : मृत्यूचे सापळे बनून नागरिकांना छळणारे खड्डे अखेर महापालिकेला दिसले. ‘लोकमत’ने या विषयावर प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत शनिवारी सर्व धोकादायक खड्डे खडी व डांबराने भरून घेतले. लवकरच पॅचवर्कही केले जाणार आहे. किमान खड्डे भरून घेतल्यामुळे नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाने शहराची दैना उडाली असतानाच, शहरातील मुख्य रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत. पाणी, गटारी व ड्रेनेजचे खड्डे महिनोन् महिने खुलेच राहिले असून, यामध्ये पडून गेल्या आठ दिवसात अठराजण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी अर्ध्यावरच काम सोडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत शनिवारी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले. तातडीच्या कामांमधून ही दुरुस्ती सुरू आहे. शहरातील राजवाडा चौकानजीक कामगार विमा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावरील गटारीवरील सुमारे चार फूट रुंद, दोन फूट लांब व सुमारे तीन फूट खोलीचा खड्डा गेल्या वर्षभरापासून खुला आहे. सिटी पोस्टासमोर व बीएसएनएल कार्यालयासमोरही ड्रेनेजचे खुले खड्डे आहेत. हे खड्डेही वर्षापासूनच उघडेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी या खड्ड्याभोवती ‘काम सुरू’ असा फलक लावला आहे. शंभर फुटीवरून शामरावनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच साई कॉलनीनजीक सुमारे चार फूट लांबी- रुंदीचा व पाच फूट उंचीचा ड्रेनेजचा खड्डा सहा महिन्यांपासून खुला आहे. गेल्या आठ दिवसांत याठिकाणी पाचजण पडून जखमी झाले आहेत. शंभर फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती कॉलनी चौकासमोर वीस ते तीस फुटाच्या पाईप गेल्या सहा महिन्यांपासून टाकण्यात आल्या आहेत. यावर अनेकदा मोटारी आदळत आहेत. मुख्य रस्त्यावरील खुले ड्रेनेज, पाईप, खड्ड्यांमुळे नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना याबाबत आलेल्या निवेदनांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली होती. ‘लोकमत’ने याबाबतचे सचित्र दर्शन घडविल्यानंतर महापालिकेला हे खड्डे दिसले. त्यांनी शनिवारी दिवसभर याठिकाणचे खड्डे भरून घेतले. पॅचवर्कचेही काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)