शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णानगर पुलावर अखेर दिशादर्शक फलक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 15:06 IST

कोरेगाव : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगरच्या कालव्यावरील पुलाजवळ  दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत मोठा दिशादर्शक फलक उभारला आहे.

ठळक मुद्देसातारा-कोरेगाव रस्त्यावर फलक उभारल्यामुळे वाहनधारकांमध्ये जागृतीवाहनधारकांचा सुटकेचा निश्वास; वळण घेऊन मार्गक्रमण या फलकामुळे आता मातीचा भराव दिसत नाही

कोरेगाव : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगरच्या कालव्यावरील पुलाजवळ  दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत मोठा दिशादर्शक फलक उभारला आहे. या फलकामुळे आता मातीचा भराव दिसत नाही. परिणामी वाहनधारक आपोआप वळण घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत. 

सातारा-कोरेगाव रस्त्यावर पोवईनाका ते संगम माहुलीदरम्यान चौपदरीकरण करण्यात आले आहे. कृष्णानगर कालव्यानजिक नव्याने पुलाची उभारणी न झाल्याने जुन्याच पुलावरुन वाहतूक सुरु असून पुलाच्या अलिकडे दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे दररोज अनेक वाहने थेट कालव्यातच उडी घेत होती.

रात्रीच्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने संगमनगर पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी आणि पीसीआर मोबाईलवरील पोलिस  कर्मचाºयांची धावाधाव होत होती.  

केंद्र सरकारने सातारा-लातूर राष्टÑीय महामार्गाची अधिसूचना काढली असल्याने हा रस्ता आपोआप त्यांच्याकडे वर्ग झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यापासून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम असल्याने ठेकेदार निविदा भरत नाहीत.

त्यामुळे आता बांधकाम विभाग दुहेरी फेºयात अडकला होता. याबाबत ‘लोकमत’ने  सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेऊन भला मोठा दिशादर्शक फलक उभारला आहे. या फलकामुळे आता मातीचा भराव दिसत नाही. वाहनधारक आपोआप वळण घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत. दिशादर्शक फलकामुळे पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास...युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वखर्चातून दिशादर्शक फलक उभारल्यामुळे वाहनधारकांमध्ये जागृती होत आहे. अपघात टळले आहेत. या फलकामुळे आता अपघात होणार नाहीत. संगमनगर पोलिस दूरक्षेत्राच्या कर्मचाºयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.