शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

फलटण-बारामती सुधारित रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी

By admin | Updated: October 24, 2015 00:57 IST

८५४ कोटींचा अंदाजित खर्च : लवकरच कामाला सुरुवात होणार

फलटण : फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे दोन वेळा सर्वेक्षण झाले होते. मात्र, त्यातील काही मार्गांमध्ये अडचणी आल्यामुळे पुढील कामकाज ठप्प झाले असताना खासदार शरद पवार यांनी सुचविलेला सुधारित रेल्वे मार्ग मंजूर झाला असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी दिली. नवी दिल्ली येथे नुकतीच रेल्वे खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीस शरद पवार, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे खासगी सचिव संजीवकुमार रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक वेदप्रकाश दुडेजा आदी उपस्थित होते.यावेळी सुधारित रेल्वे मार्गाचा सर्व्हे करून सेंट्रल रेल्वेने आपला अहवाल रेल्वे बोर्डाला दिल्याची माहिती संजीवकुमार यांनी दिली. या नव्या प्रस्तावित मार्गामध्ये बारामतीच्या अलीकडे न्यू बारामती जंक्शन असा बदल होणार आहे. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, शिंदेवाडी, कांबळेश्वर व खुंटे या गावाजवळून हा मार्ग जात आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी, ढाकळे व न्यू बारामती अशी स्थानके प्रस्तावित असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)