सातारा ते वाई35 किमीलोकमत न्यूज नेटवर्कवाई : लोकसभा निवडणुकीने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे. राजकीय उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. परंतु सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न वेगळेच आहेत. वाई तालुक्यातील तरुणाई रोजगाराच्या संधी, शेतकरी शेतीमालाच्या हमीभावाची अपेक्षा करत आहेत.वाई तालुक्यातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी वाई-सातारा एसटीतून प्रवास केला. ‘लोकमत’शी चर्चा करताना प्रवाशांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला़ वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा जास्त पर्जन्यमान तर पूर्व भाग हा पर्जन्यछायेत येणार भाग म्हणून ओळखला जातो.़ धोम डाव्या व उजव्या कालव्यामुळे लाभक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आली. त्यामुळे बागायतीक्षेत्र वाढले. ऊस, हळद, आले व इतर भाजीपाला तर पश्चिम भागात भात व इतर कडधान्य पिके घेतली जातात. या पिकांना हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे यांचा खर्च भरमसाठ वाढला. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देण्याची अपेक्षा व्यक्त होते.राष्ट्रीय कीस्थानिक मुद्दा?तालुक्यात एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने युवकांना उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जावे लागते़ उच्च शिक्षणाची स्थानिक पातळीवर सुविधा करावी व युवकांना रोजगार मिळण्यासाठी पाठपुरावा करावा़तालुक्यात शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या मोठी आहे. काही निवडक पिकांना हमीभाव आहे. परंतु अनेक पिकांना हमी भाव नाही. हमी भाव मिळण्यासाठी आवाज उठवावा़
पोट भरेना वाडीत, माथाडी राबतो मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:47 IST