शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे झाडे लावून आईला वाहिली आदरांजली

By admin | Updated: July 8, 2017 13:41 IST

भोसले कुटुंबीयांचे मातृप्रेम : राजाळेत १५ वर्षांत पाच हजार झाडांची लागवड

आॅनलाईन लोकमत फलटण (सातारा), दि. ८ : शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेचे औचित्य साधून निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या आईच्या दशक्रिया विधीदिनी आदरांजली म्हणून पाचशे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून ते जोपासण्याचा संकल्प केले.राजाळे, ता. फलटण येथील पार्वतीबाई जयंवतराव भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माजी अध्यक्ष विश्वासराव भोसले यांच्या मातोश्री होत्या. पार्वतीबाई भोसले या शेतकरी कुटुंबातील आणि निसर्गप्रेमी असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून राजाळे गावात गेल्या १५ वर्षांपासून सुमारे पाच हजार विविध प्रकारची झाडे लावली असून, त्यांचे संरक्षण व संवर्धन उत्तम प्रकारे केले आहे. आपल्या मातोश्रीची इच्छा आणि त्यांची आवड लक्षात घेऊन वनविभाग राजाळे, ग्रामपंचायत, जानाई हायस्कूल व ग्रास्थांच्या सहकायार्ने आतापर्यत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. आवडीची जोपसणा करीत त्यांच्या मुुलांनी दशक्रिया विधीनंतर राजाळे परिसरात विविध प्रकारची झाडे लावून एक आगळी वेगळी श्रद्धांजली आपल्या आईला वाहिली केवळ वृक्षारोपण न करता ती संगोपन करून मोठी करण्याचा मानस यावेळी विश्वासराव भोसले यांनी केला.