शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

महाबळेश्वरात माळीणची छाया : डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये भीती; सांगा दरड हटविणार कधी?, संतप्त ग्रामस्थांचा सवाल

अजित जाधव-- महाबळेश्वर --अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळा आला की नागरिकांना पाऊसपाण्यापेक्षा दरडी कोसळण्याचीच भीती अधिक असते. तालुक्यातील माचूतर गावाजवळ पंधरा दिवसांपूर्वी कोसळलेली महाकाय दरड अजून जैसे थेच आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावर माचूतर हे गाव आहे. हे गाव दोन भागांत वसले आहे. गावातील काही भाग रस्त्याच्या कडेला तर बराचसा भाग डोंगर उतारावर वसलेला आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या गावावर माळीण गावाप्रमाणे डोंगरकडे कोसळण्याची भीती गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत. दि. २२ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे डोंगरकड्याचा काही भाग रस्त्यावरच कोसळला. परिणामी गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. या रस्त्याने होणारे सर्व दळणवळणही बंद पडले. सुदैवाने गावापासून काही मीटर अंतरावर ही दरड कोसळली त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. या दरडीच्या कक्षेत गावातील काही घरे येत होती; परंतु सुदैवाने गडगडत येणाऱ्या दरडीमधील मोठमोठे दगड घरांपासून काही अंतरावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. गावाच्या माथ्यावर असलेला कडा जर कोसळला तर या कड्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले असते. येथील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. माचूतर गावाजवळ दरड कोसळण्याच्या घटनेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणत्याही दरड हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान, शनिवारी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, नगरसेवक संतोष शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत घाडगे, अतुल सलागरे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन दरडीची पाहणी केली. यावेळी माचूतरचे सरपंच नारायण शिंदे व ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. पुनर्वसनाबाबत पाठपुरावा करू : बानुगडे‘ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे गावावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. आपण हे निवेदन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत पोहोचवून ग्रामस्थांच्या भावना त्यांना कळवू व पुनर्वसना संदर्भात योग्य तो निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येईल,’ असे आश्वासन प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.ग्रामस्थांची रात्र जागून माचूतर येथे दरड कोसळून आठवडा झाला तरी ती दरड हटविण्याची तसदी संबंधित खात्याने घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्याने ग्रामस्थांना सतत दरडी कोसळण्याची भीती वाटत आहे. या भीतीपोटी गावातील लोक रात्रभर जागे राहत आहेत. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल या भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.