शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सत्ताधाऱ्यांविरुद्ध ‘फिल्डिंग’

By admin | Updated: July 27, 2015 00:18 IST

खंडाळा तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

शरद ननावरे -खंडाळा  -खंडाळा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींपैकी सहा गावे बिनविरोध झाली असून, उर्वरित ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीच सरळसरळ लढत असून, काही गावांत शिवसेना, भाजप तर स्वाभिमानी, आरपीआयचेही उमेदवार उभे केलेले आहेत. सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विरोधक एकवटल्याने लढती चुरशीच्या होणार असून, कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे तालुक्याचे राजकारण हाताळणाऱ्या मंडळींनाही गावच्या वेशीबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तालुक्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या स्वराज्य संस्थेत एक खुर्ची आपल्याही नावाची असावी, यासाठी प्रत्येकजण इच्छुक आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पॅनेलव्यतिरिक्त अपक्षांचेही पीक जोमाने वाढले आहे. तालुक्याच्या सध्याच्या परिस्थितीनुसार खंडाळा, अहिरे, नायगाव, अंदोरी, खेड, बोरी, पाडळी, बावडा, शिंदेवाडी, भादे, ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस असल्याने या लढती अटीतटीच्या होणार आहेत. परंतु सर्वत्र निवडणूक ग्रामपंचायतीची प्रतिष्ठा नेत्यांची अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.सर्वाधिक मोठ्या असलेल्या खंडाळा ग्रामपंचायतीसाठी काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे व राष्ट्रवादीचे समन्वय समितीचे अध्यक्ष शामराव गाढवे यांच्या पॅनेलमध्ये चुरस आहे. अहिरे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीचे सभापती रमेश धायगुडे व काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या वंदना धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतिहासात आजपर्यंत बिनविरोधचा डंका मिरविणाऱ्या पळशी ग्रामपंचायतीत प्रथमच निवडणूक लागली असून, येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्यासमोरच आव्हान निर्माण झाले आहे. नायगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते व समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भादे ग्रामपंचायतीत पंचायत समितीच्या सदस्या दीपाली साळुंखे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुनीती धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंदोरीत जिजाबा धायगुडे यांची ताकद अजमावली जात असून, कोपर्डे ग्रामपंचायतीत मुंबई बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे यांची तर खेड बुद्रुक ग्रामपंचायतीत माजी सदस्य बापूराव धायगुडे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेवराव धायगुडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर पारगाव ग्रामपंचायतीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील तसेच बावडा ग्रामपंचायतीत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनोज पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रंगतदार लढती...खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वर्चस्वावरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेची गणिते मांडली जातात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कडव्या संघर्षात काही जागी शिवसेनेने उडी घेतल्याने लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे गावागावातून आता रात्री जागवल्या जात आहेत.