शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कुठल्याही वयोगटातील ताप, पुरळ असू शकतो गोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वातावरणातील बदलांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यात कोविडच्या संसर्गामुळे अधिक सतर्कता बाळगावी लागत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वातावरणातील बदलांमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यात कोविडच्या संसर्गामुळे अधिक सतर्कता बाळगावी लागत आहे. गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा संसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. त्यात आधी सर्दी, खोकला, ताप येतो आणि नंतर अंगावर पुरळ उठतात. निरोगी मुलांना याचा विशेष त्रास होत नसला तरी शरीरावर कोणत्याही प्रकारचे पुरळ दिसले तरीही ते गोवर असू शकते असे समजून उपचार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात. रुबेला हा आजार पूर्णपणे संसर्गजन्य असल्याने गर्भवतींना गर्भपाताचा धोका, बालकांना मोतिबिंदू, हृदयविकार, गतिमंद, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. सर्दी, खोकला, ताप व पुरळ उठणे ही याची मुख्य लक्षणे आहेत. या आजारावर लसीकरण हाच पर्याय आहे.

गोवरमध्ये पुरळ सर्वप्रथम कपाळावर, कानामागे, मानेवर येतात. नंतर ते हातापायापर्यंत पसरते. रॅश किंवा पुरळ आल्यानंतर हळूहळू तापाचे प्रमाण कमी होते. साधारणपणे आठवड्यानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. याचा खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो.

गोवर झालेल्या रुग्णांमध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. गोवरविरुद्ध परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहे, ती घेण्यासाठी पालकांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत.

चौकट :

असे केले जाते निदान..

गोवरच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याची लक्षणे दिसतात. यात डोळे लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला आदी त्रास जाणवतो.

तोंडात, गालाच्या आतील बाजूस लालसर ठिपके आढळून येतात. हे ठिपके म्हणजे गोवरची हमखास आढळणारी खूण समजावी

लालसर दिसणारे हे ठिपके एक-दोन दिवसांत जातात. त्यामुळे रोगनिदानासाठी यावर अवलंबून राहता येत नाही. ठिपके दिसले तर ते गोवर आहे हे मात्र नक्की.

गोवर नेमकं काय आहे..

लसीकरणामुळे गोवरची साथ कमी झाली आहे. गोवर हा संसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. यावर कुठलेही अँटीबायोटिक नाही. गोवरवर उपचार नसल्याने कानात ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’ सोबतच ‘ब्रोकांयटिस’ आणि घातक ‘न्यूमोनिया’ आणि ‘ब्रेन इन्फेक्शन एन्सेफेलायटिस’पर्यंत त्यात बदल होऊ शकतो. गोवरवर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.

गोवर रुबेलाचे लसीकरण

एमआर लसीकरण मोहिमेत नऊ महिने पूर्ण आणि १५ वर्षांपेक्षा कमी अशा सर्व बालकांना ही लस दिल्याने गोवर व रुबेला या दोन्ही रोगांची लागण होण्याचे प्रमाण कमी असते. गोवर, तसेच रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंतही दिसून येतात. त्यामुळे १५व्या वर्षांपर्यंतच्या बालकांना लस दिल्याने या आजारावर नियंत्रण मिळविता येते. ही मोहीम झाल्यानंतर गोवर लसीऐवजी एमआर एक, एमआर दोन अशा पद्धतीने नेहमीचे लसीकरण केले जाते.

कोट :

मुलांना ताप येत असल्यास आणि अंगावर पुरळ येत असल्यास लगेचच फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बदलत्या हवामानामुळे गोवर संशयित आजार निर्माण होण्याची शक्यता असते. पालकांनी अशावेळी लगेच निदान व उपचारांवर भर द्यावा.

- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ.