शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजांकडून कासवरील कुंपण जमीनदोस्त

By admin | Updated: July 8, 2017 21:58 IST

रात्रभर धिंगाणा : जाळ्या पुन्हा उभ्या करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न; १७० प्रशिक्षणार्थी लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा स्थळ तसेच जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठारावर बुधवारी रात्री मद्यपी, हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून फुलांच्या संरक्षणासाठी २०१२ मध्ये उभारण्यात आलेल्या सिमेंटचे खांबापैकी चाळीस खांब तोडून, संरक्षक जाळी जमीनदोस्त करून तसेच स्वच्छतागृहाच्या दरवाजाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.दरम्यान, संरक्षक जाळ्या तसेच खांब तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभे करण्यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांकडून तसेच कास पठारावर अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या वनविभागाच्या प्रशिक्षण विद्यालयाच्या १७० कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास पठारावर सध्या सर्वत्र हिरवाई तसेच सर्वाधिक उंचीचा वजराई धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधू लागला आहे. शनिवार, रविवार अथवा सलग सुटी असल्यावर पर्यटकांची पर्यटनासाठी मोठ्या संख्येने गर्दी लागली आहे.येत्या काही महिन्यांतच रंगीबेरंगी फुलांचा गालिचा पाहण्यासाठी जिल्हा, राज्य तसेच देशभरातून पर्यटकांचे वेध कास पठारावर जाण्यासाठी लागलेले असताना तत्पूर्वीच मद्यपीकडून कास पठारावर फुलांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेले सिमेंटचे खांब व संरक्षक जाळ्या तोडून मोठ्या प्रमणावर नुकसान केले आहे. येत्या हंगामात फुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, यासाठी पुन्हा खांब उभे करण्यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.कारवाईची मागणी...उन्हाळ्यात कास पठार परिसरातील हिरवाईला वणव्याची कीड लागू नये, यासाठी वनविभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र पहारा दिला होता. वणव्यापासून पठाराचे नुकसान होऊ नये, यासाठी दिलेला पहारा अत्यंत स्तुत्य होता. परंतु बुधवारी पठारावर घडलेल्या विघातक घटनेने विघ्नसंतोषी लोकांच्या हुल्लडबाजीला वनविभाग चाप कसा बसवणार, हा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडत असून, अविवेकी विघ्नसंतोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक, पर्यावरणप्रेमींतून होत आहे. बुधवारी रात्री पठारावर मद्यपी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून संरक्षक जाळ्या तसेच सिमेंटचे खांब मोडून झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू आहे.- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली