शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

बिबट्याच्या तावडीतून पितापुत्र बचावले

By admin | Updated: November 13, 2014 23:42 IST

वीरवाडीतील घटना : उसाला पाणी पाजताना हल्ल्याचा प्रयत्न

उंडाळे : अगदी जवळ आलेल्या बिबट्याच्या तावडीतून शेतकरी पितापुत्र बचावल्याची घटना वीरवाडी-पाटीलवाडी (ता़ कऱ्हाड) येथे घडली. गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी आरडाओरडा करीत बिबट्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकल्यानंतर तो पसार झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वीरवाडी येथील काशिनाथ वीर व त्यांचा मुलगा प्रवीण हे दोघे गुरूवारी पहाटे आपल्या ‘जुगाई मंदिर’ नावच्या शिवारात गव्हाच्या पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले़ पाणी देऊन झाल्यानंतर नजीकच असलेल्या उसाच्या शेताला पाणी लावण्यासाठी ते उसात गेले. त्यावेळी उसात दबा धरून बसलेला बिबट्या काशिनाथ व प्रवीण यांना बॅटरीच्या प्रकाशात दिसला़ त्यांना पाहताच बिबट्याने मोठ्याने डरकाळ्या फोडण्यास सुरूवात केली़ प्रवीणने बॅटरी चालू-बंद करत अवघ्या आठ फुटावर असणाऱ्या बिबट्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला़ मात्र, बिबट्याने पुढे येऊन दोघांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला़ काशिनाथ व प्रवीण यांच्या दिशेने झेपावलेला बिबट्या उसाला धडकल्यामुळे खाली कोसळला. याच वेळी काशिनाथ व प्रवीणने आरडाओरडा केला आणि उसातून बाहेर पळ काढला. सुमारे पंधरा मिनिटे हे थरारनाट्य सुरू होते. काशिनाथ व प्रवीण सुदैवाने सुखरूप बचावले. (वार्ताहर)पंधरा दिवसांत दुसरी घटनागेल्या आठवड्यात याच परिसरातील लटकेवाडीत रात्रीच्या वेळी एका धावत्या जीपवर बिबट्याने झेप घेतली होती. दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांवर त्याने झडपही घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे शेतकरी दिवाससुध्दा शेतात जाण्यास घाबरत आहेत़