शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद

By admin | Updated: February 21, 2017 23:32 IST

तालुक्यात ६९.९२ टक्के मतदान : दुपारनंतर वाढला टक्का; मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष

फलटण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी फलटण तालुक्यात चुरशीने ६९.९२ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ व पंचायत समितीचे १४ गण असून, जिल्हा परिषदेसाठी ३३ तर पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास शांततेत सुरुवात झाली. सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत १० टक्के तर दुपारी साडेतीनपर्यंत ५५.८४ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला होता.उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर पडण्यासाठी विनविण्या करताना दिसत होते. अनेक उमेदवारांनी मतदाराला मतदानाला आणण्यासाठी व पुन्हा सोडण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती. अपंग किंवा अत्यंत वयस्कर यांना मतदान केंद्राच्या बाहेर वाहनातून आणून सोडले जात होते.आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव मतदान केंद्रावर तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांनी कोळकी येथे मतदान केले. दोघेही राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवीत आहेत. वाठार निंबाळकर गणातील उमेदवार विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांनी सोनगाव बंगला येथे मतदान केले.राष्ट्रीय काँग्रेसच्या गिरवी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी निंभोरे, हिंगणगाव गटातील धनंजय साळुंखे-पाटील यांनी सुरवडी येथे तर गिरवी पंचायत समिती उमेदवार जयश्री आगवणे यांनी गिरवी येथे मतदान केले.भाजपाचे गिरवी गटातील उमेदवारी सह्याद्री कदम यांनी गिरवी येथे मतदान केले. राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी सुरवडी येथे तर दिगंबर आगवणे यांनी गिरवी येथे मतदान केले.रात्री उशिरा सर्व मतदान यंत्रे पोलिस बंदोबस्तात फलटण येथील शासकीय गोडावून येथे सुरक्षितरीत्या आणून ठेवण्यात आली. मतमोजणी गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)