शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहनातून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: March 28, 2017 12:38 IST

खंडाळ्यातील चित्र : पुणे-बेंगलोर महामार्गावर धोक्याची घंटा; ठोस उपाययोजनेची गरज

आॅनलाईन लोकमत

खंडाळा : पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा येथील बसस्थानकात लांब पल्ऱ्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . महामार्गावरच अनेक प्रवाशी वाहनांची प्रतीक्षा करत उभे राहतात. त्यामुळे भरधाव वेगाच्या वाहनांचा धोका पत्करून प्रवाशांना जीव मुठीत धरुन एसटी बसची वाट पहावी लागते. बसअभावी अनेकदा धोकादायक वाहनातूनही प्रवास करण्याचे धाडस प्रवाशी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

खंडाळा येथील बसस्थानक हे महामार्गावरील उड्डाणपूलाच्या शेजारीच आहे . स्थानिक गावांना जाणाऱ्या बसेस तसेच वाई, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी जाणाऱ्याच गाड्या बसस्थानकात येतात. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली यासारख्या इतर शहारात जाणाऱ्या प्रवाशांना हायवेवरच एसटीसाठी उभे रहावे लागते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी महामार्गावर मोठी गर्दी पहायला मिळते. एसटी बस येथेही हात दाखवूनच थांबवावी लागते त्यासाठी अनेकदा प्रवाशी रस्त्यावरच उभे असतात. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या इतर वाहनांचा धोका संभवतो. उड्डाण पूलाच्या बाजूलाच अनेक प्रवासी उभे राहत असल्याने खंडाळा शहरात येणाऱ्या वाहनांनाही अडचण निर्माण होते. मात्र, याकडे महामार्गा प्राधिकरण व पोलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

महामार्गावरही एसटी बस न मिळाल्यास रॉकेल, डिझेल, एलपीजी गॅस, रासायनिक द्रव्ये, घरगुती गॅस सिलिंडर असे ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गाड्यातूनही प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका आहे. धोकादायक वाहनातून हा प्रवास दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असतो, मात्र याकडेही डोळेझाक केली जाते .महामार्गावरून जाणाऱ्या विना वाहक एसटी बस सोडून इतर सर्व बसेस खंडाळा बसस्थानकात आल्यास हायवेवर उभे राहण्याचे प्रमाण कमी येईल मात्र यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे .(प्रतिनिधी)अनेकांना गमवावा लागलाय जीव !

खंडाळा येथे महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अपघाताच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वषार्पूर्वी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने आठ प्रवाशांना जागीच चिरडले होते. त्यावेळी हायवेकडेला उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बंदी करण्यात आली होती. मात्र ती घटना ताजी असतानाही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.