शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोयना लाभक्षेत्रातील जमिनी न मिळाल्यास उपोषण : पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

सातारा : ‘कोयना धरणाचे पाणी लाखो एकराच्या सिंचनासाठी, विजेसाठी दिले जात असतानाही या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन दाखवली जाते ती ...

सातारा : ‘कोयना धरणाचे पाणी लाखो एकराच्या सिंचनासाठी, विजेसाठी दिले जात असतानाही या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन दाखवली जाते ती विखुरलेली, सिंचनाचा लाभ न होणारी आणि आवश्यक जमिनीच्या पाच टक्केसुद्धा नसणारी आहे. त्यामुळे शासनाच्या या क्रूर वागण्याच्या विरोधात कोयना धरणग्रस्त हे कंबर कसणार आहेत. हजारोंच्या संख्येने बेमुदत उपोषण करणार आहेत,’ अशी माहिती ‘श्रमुद’ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

कोयना धरणाचे सुमारे ४१ अब्ज घनफूट पाणी सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील लाखो एकर जमिनीला मिळत असतानाही ६४ वर्षे रखडलेले पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी लाभक्षेत्रातली जमीन देण्याचा विचार केलेला नाही. कोयना, कृष्णा काठावरील उपसा सिंचन योजना, टेंभू योजना, ताकारी योजना, म्हैशाळ योजना या सर्व योजनांचे पाणी ४१ अब्ज घनफुटापेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर वांग धरणाचे लाभक्षेत्र हे टेंभू योजनेत असू शकते. कोयना धरणाचे पाणी या सर्व योजनांना असताना कोयना धरणाचे लाभक्षेत्र का असू शकत नाही, असा मुद्दा अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही.

या पार्श्‍वभूमीवर शासनाने ताबडतोब टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात वांग धरणग्रस्तांना वाटून राहिलेली शिल्लक जमीन आणि कमी पडली तर उरलेल्या लाभक्षेत्राला तातडीचे कलम लावून जमीन उपलब्ध केली पाहिजे. आधीच कोयना धरणग्रस्तांना ६४ वर्षे अनेक यातना दिल्या आहेत. आता माळरानावरची, कसण्यास न येणारी, सिंचनाची सुविधा नसणारी आणि विखुरलेली जमीन उपलब्धतेमध्ये दाखविण्यात आली आहे. त्या - त्या जिल्ह्यांमधील आणि विशेषत: सातारा जिल्ह्यामधल्या नव्या धरणांच्या धरणग्रस्तांना वाटून शिल्लक राहणारी जमीन ही जमीन सिंचयाचा भाग असल्यामुळे ती जमीनसुद्धा कोयना धरणग्रस्तांना वाटपासाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे. अशी शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे. जमीन असूनही जमीन उपलब्ध नसल्याचे चित्र उभे केले जात आहे, हे तातडीने बदलले पाहिजे, अशी मागणीही डॉ. भारत पाटणकर यांनी केली.

यावेळी हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, सचिन कदम, प्रकाश साळुंखे, मालोजी पाटणकर, चैतन्य दळवी, संतोष गोटल, भगवान भोसले, आनंद निवळे, राजन देशमुख उपस्थित होते.