शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

वेगवान ‘ग्रे हाउंड’, धिप्पाड ‘ग्रेट डेन’, देखणी ‘लासा’

By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST

कऱ्हाड कृषी प्रदर्शन : स्पर्धेत शेकडो श्वानांचा सहभाग; आठ महिन्यांचा ‘हार्लिक्विन’, पंधरा सेंटीमीटरचा ‘मिनिअ‍ेचर’ आकर्षण

कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला शुक्रवारी तिसऱ्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. प्रदर्शनातील नावीन्यपूर्ण अवजारे, प्रगत तंत्रज्ञान, शेती, शेतीपूरक व्यवसाय व गृहोपयोगी वस्तू पाहून शेतकरी सुखावले. या प्रदर्शनात शुक्रवारी श्वान स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये विविध जातींचे शेकडो श्वान सहभागी झाले होते.श्वान प्रदर्शनात डॉबर मॅन, लॅब्रॉडर, आॅलसीसीन, बुल मस्टिफ, कॉकसेसियस, जर्मन शेफर्ड, गे्रहोंड, ग्रेडेन, कारवान, मुधोळहोंड, बॉक्सर, रॉट व्हिलर, युटीलिटी, पश्मी, पामेरियन, या सर्वसाधारण गटातील शेकडो श्वान स्पर्धेत दाखल झाले होते. श्वानांचे मालक उत्सुकतेने माहिती घेणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देत होते. फॅन्सी डॉगमध्ये पग, लासा (डेशहाउंड), पांढरी केसाळ पामेरियन, अ‍ॅपसो, कॉकर स्पॅनिअल लहान मुलांसह महिलांचे आकर्षण ठरत होते. अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण असणारी ही श्वान दिसायला देखणी होती. चपळ व वेगवान असणारे ग्रेहोंड, धिप्पाड व दणकट असणारे ग्रेडेन, शिकारीसाठी प्रसिद्ध असणारे कारवान व पश्मी यांची माहिती लोक उत्सुकतेने घेत होते. तर कुटुंबांशी समरस होणाऱ्या लॅब्रॉडोरनेही उपस्थितांची मने जिंकली.ग्रेट डेन गटातील हार्लिक्विन या जातीचा आठ महिन्यांचा सर्वांत उंच श्वानही आकर्षण ठरत होता. ‘मिनिअ‍ेचर’ हा सुमारे १५ सेंमी उंचीचा सर्वात लहान श्वान पाहण्यासाठी गर्दी होत होती. सेंट बर्नाड व इंग्लिश मॅस्टिक हे सर्वांत मोठी असणारे व जबडा मोठे असणाऱ्या श्वानाची माहिती घेण्यासाठी गर्दी झाली होती. श्वानांचे मूल्यांकन करण्यासाठी श्वान डॅशबोर्ड आखण्यात आला होता. यामध्ये श्वानाची चाचणी घेऊन तपासणी करण्यात येत होती. हे पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पिलांची किंमत पंधरा हजारांपर्यंतसांगली जिल्ह्यातूनही प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने श्वान आले होते. जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पग जातीचे श्वान पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर चढाओढ दिसून येत होती.अनेक श्वान मालकांनी त्यांच्या श्वानाची पिल्लेही विक्रीसाठी आणली होती. ज्यांच्या किंमती ५ हजारांपासून १५ हजारांपर्यंत होत्या. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या प्रदर्शनात ग्रेट डेन जातीचे श्वान मोठ्या संख्येने दिसून येत होते. प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तूंची रेलचेलकऱ्हाड : यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात यावर्षी मेक इन महाराष्ट्रचाही बोलबाला आहे. कृषिपूरक पदार्थांबरोबरच अनेक गृहोपयोगी वस्तूंनी प्रदर्शन सजल्याचे पाहावयास मिळत आहे. बचतगटांना तसेच शेतकऱ्यांना काही स्टॉल्स मोफत देण्यात आले आहेत. या बचत गटांचीही उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. शीतपेये, गुणकारी औषधे, आयुर्वेदिक वनस्पती, संसारोपयोगी साहित्यही प्रदर्शनात विक्रीस उपलब्ध आहे. (प्रतिनिधी) मातीच्या भांड्यांचा वापरप्रदर्शनात यावर्षी प्रथमच मिट्टीकुलचा मातीच्या भांड्यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. मातीचा कुकर, मटका, वॉटर बॉटल, वॉटर फिल्टर, डिनर सेट, तवा यासह अन्य गृहोपयोगी वस्तू मातीच्या बनविलेल्या आहेत. ही उत्पादने प्रदर्शनात उपलब्ध असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही भांडी बनविण्यासाठी पाच प्रकारांच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. शरीरास उपयुक्त असणारी जीवनसत्त्वे या भांड्यांच्या वापरातून मिळत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आरोग्यासही फायदा होत असल्याचेही सांगण्यात आले. मातीच्या भांड्यांचे तीन स्टॉल्स प्रदर्शनात आहेत.