शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

अपेक्षेवर पाणी : चांगले पैसे मिळतील म्हणून घरात रचून ठेवली होती पोती

कोपर्डे हवेली : सोयाबीन काढणीच्या हंगामात दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता दर वाढेल यासाठी सोयाबीनची पोती घरामध्येच रचून ठेवली. मात्र, सध्या दर वाढण्याऐवजी घसरत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. यावर्षीचा सोयाबीन हंगाम अनेक गोष्टींमुळे अडचणीत आला होता. प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. परीणामी, सोयाबीनला चांगला दर मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. सोयाबीन काढणीपूर्वी सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रूपये क्विंटलचा दर होता. हंगामाच्या काढणीवेळी तो दर २ हजार ८०० रूपये ते ३ हजार रूपयेवर आला होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोयाबीन पिकाच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोयाबीन बियाणे दुप्पटीने महागले आहे. तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सरासरी एकरी ७ ते ८ क्विंटल सोयाबीन शेतकरी काढतात. ते उत्पादन यावर्षी ३ ते ४ क्विंटलवर आले असल्याने आणि दरात वाढ होत नसल्याने सोयाबीनची शेती तोट्यात आली आहे. गत महिन्यामध्ये सोयाबीनचा दर क्विंटलला ३ हजार ३०० रूपये होता. दर वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, वाढण्याऐवजी गेल्या आठवड्यापासून दर उतरले आहेत. ३ हजार रूपये क्विंटलचा सोयाबीनचा दर झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये विक्रीसाठी शिल्लक ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून बसला आहे. दर वाढण्याऐवजी दर कमी होत असल्याने शिल्लक सोयाबीनचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (वार्ताहर)सोयाबीनला ५ हजार रूपये क्विंटलप्रमाणे दर मिळाला पाहिजे. तरच सोयाबीन पिकाचे उत्पादन परवडेल. दरात वाढ होण्याऐवजी दर घसरत असल्याने शिल्लक ठेवलेल्या सोयाबीनचे काय करायचे असा आमच्यापुढे प्रश्न आहे. - जगन्नाथ चव्हाण, कोपर्डे हवेली