शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 13, 2015 23:59 IST

शशिकांत शिंदे : मंत्री केवळ मतदारसंघापुरतेच उरले असल्याची टीका

पुसेगाव : ‘शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राज्याच्या विकासासाठी शासनाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. राज्यातील मंत्री हे राज्याचे मंत्री राहिले नसून ते स्वत:च्या मतदारसंघापुरते राहिले आहेत. त्यांच्या मतभेदांचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे,’ अशी टीका माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.मोळ येथे नूतन ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, वडूज मार्केट कमिटीचे सभापती सुनील घोरपडे, सतीश फडतरे, श्रीमंत झांजुर्णे, खरेदी-विक्री संघाचे संचालक डॉ. आनंदराव भोसले, मनोज गोडसे, पांडूरंग गोडसे, सरपंच सुप्रिया वाघ, उपसरपंच मोहन घाटगे, सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत घोरपडे, उपाध्यक्ष विजय भंडलकर, दिलीपराव काळंगे, किसनराव वाघ, जगन्नाथ घाटगे उपस्थित होते. आमदार शिंंदे म्हणाले, ‘दुष्काळाच्या छायेत आपला शेतकरी कसे जीवन जगत असेल याविषयी तळमळ असल्यामुळे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खटाव-माणसह मराठवाड्याचा दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलने ही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुष्काळी भागाचा दौरा करण्याचा दिखावा केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ठोस मदत त्यांनी जाहीर केली नाही.’ (वार्ताहर)सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला ‘आघाडी शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांची केवळ नावे बदलून राज्यातील भाजप-शिवसेना सरकार नवीन योजना म्हणून राबवित आहे. राज्यातील या सरकारला एक वर्षे पूर्ण होत आली तरी अद्यापही ठोस विकासकामे दिसत नाहीत. राज्यातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखून सत्तेवर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीकाही यावेळी आमदार शिंदे यांनी केली.