श्वानांचा उच्छाद
सातारा : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या महिन्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन अनेक नागरिकांना जखमी केले होते. अद्यापही भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचे नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. या समस्येवर सातारा पालिकेने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ऑनलाईन ग्रामसभा
सातारा : कोंडवे (ता. सातारा) येथील ऑनलाईन ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण गाडे होते. यावेळी विविध योजनेच्या विषयांचे प्रोसिडिंग ग्रामसेविका एस. एल. मिसाळ यांनी वाचन केले. यावेळी उपसरपंच सुलभा भुजबळ, मोहीत चोरगे, जमीर शेख, बजरंग दीक्षित, लीला निंबाळकर, दिलीप निंबाळकर उपस्थित होते.
सुसंवाद हवा
सातारा : कोरोनामध्ये आपल्यामधील प्रत्येक कुटुंबाने मानसिक ताण-तणावांचा सामना केला आहे. आत्महत्या टाळण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे. आत्महत्या टाळण्यासाठी सुसंवाद हा महत्त्वाचा असल्याने प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
अजिंक्यताऱ्याची वाट बिकट
सातारा : हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पालिकेने किल्ल्यासह परिसराच्या विकासाची घोषणा केली होती. मात्र, त्या घोषणेचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.