शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव ...

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळी पिकाच्या शेती सिंचनासाठी हे पाणी उजव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. नेर तलावाच्या शेती सिंचन क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी सारा भरून सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सु. मो. खाडे यांनी केले.

खटावमधील शेतकऱ्यांना नेर तलावातील पाणी येरळा नदीत व दोन्ही कॅनॉलला सोडताना येत असलेल्या प्रमुख अडचणी तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पाणीसारा भरला नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात खाडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अशोक कुदळे, किसन मोरे, उमेश भिसे, रमेश शिंदे, चरण बोबडे, दीपक घाडगे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, कालवा निरीक्षक शकील पठाण आदींसह नदीकाठचे सर्व विहीर, बोर मालक ग्रामपंचायत हॉलमध्ये उपस्थित होते.

यावेळी राहुल पाटील यांनी वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्याला पाणीसारा भरूनही पाणी मिळाले नसल्यामुळे शेतकरी पाणी सारा भरावयास तयार नाहीत. अद्याप काही ठिकाणी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि ते होत नसल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाणही अधिक आहे. पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताळमेळ व समन्वय नसल्यामुळे पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन होत नसल्याचे सांगितले.

पाणी वाटप संस्था स्थापन करून शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाटप करावे. शासनाच्या धोरणानुसार कालवा दुरुस्तीचे तसेच बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता प्रस्ताव दिले असले, तरी जर सिंचन प्रकल्पात असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांकडून महसूल गोळा होत नसेल, तर दुरुस्ती खर्च करताना अडचणी येतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पाणीसारा रूपात महसूल जमा करणे बंधनकारक असल्याचे खाडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाणी सारा भरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे मत उमेश भिसे यांनी व्यक्त केले.

11खटाव

नेर तलावातील पाणी डाव्या कालव्यात व नदी पात्रात सोडण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना उपविभागीय अभियंता खाडे. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.