शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्के उठविण्यासाठी सात गावांतील शेतकरी एकत्र

By admin | Updated: August 9, 2016 23:53 IST

खंडाळ्यात उपोषण सुरू : प्रश्न मार्गी लावण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांचे आश्वासन

खंडाळा : औद्योगिकीकरणासाठी अधिग्रहीत जमिनीवरील शिक्के उठविण्यासाठी खंडाळ्यातील सात गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. शिक्के उठविण्यासाठी ठोस भूमिका शासनपातळीवर घेतली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.खंडाळ्यातील बावडा, खंडाळा, मोर्वे, अहिरे, शिवाजीनगर, म्हावशी, भादे या गावांतील १६८० हेक्टर क्षेत्रांवरील औद्योगिकीकरणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील शिक्के काढून शेतकऱ्यांना त्या कसण्यासाठी रिकाम्या कराव्यात. ही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून खंडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मूक मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला. सात गावांतील तीस शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.या उपोषणाची दखल घेऊन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या समवेत शेतकऱ्यांची चर्चा केली. जमिनीवरील शिक्के काढण्यासंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्याशी मुंबई येथे एक बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, जोपर्यंत राज्यकर्ते दखल घेत नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. (प्रतिनिधी)