शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेने टाकली नांगी

By admin | Updated: December 17, 2014 22:51 IST

शेतकरी संघटनेची शकले

संजय कदम - वाठार स्टेशन  ल्या वर्षी ऊसदरासाठी तोडफोड आंदोलने करत आक्रमक झालेली शेतकरी संघटना यंदा मात्र सत्तेच्या गाजराला भुलली अन् आंदोलन दिशाहीन झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी शासनाला धारेवर धरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शकले पडली अन् शेतकरी एकटा पडला.उसाच्या चालू गाळप हंगामात उसाचा पहिला हप्ता जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत जाहीर होणार याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष असते. चालू वर्षी जयसिंगपुरात ऊस परिषद झाली. मात्र, या ऊस परिषदेत ऊसदराबाबतची आक्रमकता कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे आजपर्यंत ऊसदराचा प्रश्न जशाचा तसा ठेवत या संघटनेने राजकीय स्वार्थापोटी नांगी टाकली. केंद्राने एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ करत साडेनऊ साखर उताऱ्यासाठी २२०० रूपये एफआरपी जाहीर करत पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २३४ रूपये याप्रमाणे जिल्ह्याचा साखर उतारा लक्षात घेता २५०० ते २६०० एफआरपी किंमत होते. यातून तोडणी वाहतूक वजा जाता २००० ते २१०० हा दर निश्चित होईल. परंतु कारखान्यांसाठी २००० रूपये देणेही सद्य:स्थितीत शक्य नाही. त्यामुळे चालू वर्षी १७०० ते १८०० एवढाच उसाचा पहिला हप्ता देणार असल्याची भूमिका कारखानदार व्यक्त करतात.ऊसशेती ही दिवसेंदिवस न परवडणारी बाब झाली आहे. ऊसबियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी या सर्वांचा विचार करता ज्या प्रमाणात शेतकरी उसासाठी खर्च करतो, त्या तुलनेत ऊसदर मिळत नसल्याने भविष्यात ऊसदराला कंटाळून ऊस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी किमान २४०० ते २५०० रुपये प्रतिटन दर मिळाला तर नव्या वर्षात उसाचे पीक उभे दिसेल, अन्यथा पुढील वर्षात ऊस टंचाईचा सामना जिल्हयातील कारखानदारांना करावा लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. याप्रश्नी सरकाने शेतकऱ्यांसाठी विशेष थेट अनुदान जाहीर करून ते शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावेत.एकूणच चालू वर्ष हे ऊस उत्पादकांसाठी कडूच ठरणार, अशी स्थिती आहे.ऊसदराबाबत भविष्यात आंदोलने घडू नयेत, याबाबत मार्ग काढण्यासाठी नव्या सरकारने कारखान्यातील सर्व घटकांना समावेशक असे ऊसदर नियंत्रण समिती स्थापन केली. मात्र, या समितीतील सदस्यांमध्येच एकमत नसल्याने ऊसदर निश्चित करण्यात अपशयच आले.शेतकरी संघटनेची शकलेस्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमकता कमी झाल्याने या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी या संघटनेशी काडीमोड केला तर रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव गोडसे हे या संघटनेतून बाहेर पडले व राज्यातील शेतकऱ्यांच्या हितार्थ ’बळीराजा’ या नवीन शेतकरी संघटनेची स्थापना केली. आज बळीराजा हीच संघटना शेतकऱ्यांच्या ऊसदरासाठी आक्रमक झाली आहे. या संघटनेने दि. २१ डिसेंबरपासून जिल्ह्यातील कारखान्यांनी ३ हजार ५०० रूपये दर देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.सहकाराचे वलय असलेल्या सातारा जिल्ह्यात सहकारी कारखान्यांच्या बरोबरीने खासगी साखर कारखानदारी उभी राहिली आहे. जिल्ह्यात एकूण १३ कारखान्यांपैकी ५ कारखाने खासगी आहेत. भविष्यात अजून २ सहकारी कारखाने खासगी होण्याची शक्यता आहे.