शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

दूधदर घटल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: November 17, 2014 23:25 IST

वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे

कोपर्डे हवेली : शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात़ मात्र, सध्या हे शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत. गत काही दिवसांपासून दूध दरात कपात झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. दूध दरात चार-पाच रुपयांचा फरक पडत असल्याने हा व्यवसाय करणारे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहेत़ अशातच दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहेत़ काहीचा प्रपंच दुधावरच अवलंबून आहे़ पशुखाद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना ६ नोव्हेंबरपासून दूध संघ व शासनाने लिटरमागे तीन-चार रुपयांची कपात केल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे़ गत महिन्यापर्यंत म्हशीच्या दुधाचा लिटरचा दर दहा फॅटला ४९ रुपये होता़ हाच दर ६ नोव्हेंबर पासून ४५ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे़ गाईच्या दुधाचा चार फॅटचा दर २३ रुपये ४० पैसे होता़ सध्या तोच दर २१ रुपये ४० पैसे करण्यात आला आहे़ तीन-चार रुपये दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे़ त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी गोत्यात आल्याचे दिसत आहे़ ऊसदराचे घोंगडे भिजत पडले आहे़ अशातच दूध दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या शेतकरी संघटनेत वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आहेत. ऊसदराबाबतही अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे दूध दर वाढीसाठी कोण आवाज उठवणार? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उभा ठाकला आहे़ दूध दर वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त होऊ शकतो़ (वार्ताहर)पशुखाद्याचे दरही अस्थिरपशुखाद्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. दूध उत्पादकांना हा खर्च भागवितानाच नाकीनऊ येत आहेत. सरकी पेंड ५० किलोचा दर गत महिन्यात १ हजार १०० रुपये होता. त्यानंतर हा दर ५० रुपयांनी कमी होऊन सध्या तो १ हजार ५० रुपये झाला. सध्या या दरामध्ये २५ रुपये वाढ होऊन सरकी पेंड ५० किलोचा आजचा दर १ हजार ७५ रुपये झाला आहे.दूध दरामध्ये कपात झाल्याने दूध व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे़ दुधाची दरवाढ होण्यासाठी दूध संघ आणि शासन यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- लक्ष्मण चव्हाण, दूध डेअरी चालक, कोपर्डे हवेलीखाद्याचे दर, वैरण, खताचे दर आणि दूध दर या गोष्टींचा विचार केला असता, अगोदरच दूध व्यवसाय गोत्यात आहे़ त्यामध्येच दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे़ दूध दर वाढीसाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे़ - जगन्नाथ चव्हाण, दूध उत्पादक