शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की कंपन्यांपुढे शेतकरी हतबल!

By admin | Updated: October 20, 2015 23:51 IST

मोरणा परिसरातील चित्र : जमीनमालकावर खंडणी, मारहाणीचे गुन्हे : ’तारीख पे तारीख’ मुळे हैराण

पाटण : पोटच्या गोळ्याप्रमाणे जतन करून ठेवलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनी कवडीमोल किमतीला विकून पवनऊर्जा प्रकल्पासाठी ज्यांनी त्याग केला, त्याच मोरणा परिसरातील शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या खंडणी, मारहाणीच्या गुन्ह्यामुळे संबंधित शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हेलपाटे घालून बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असून, पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना आता शोधू कुठे, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.गेल्या तीन वर्षांपूर्वी मोरणा परिसरातील पठारांवर पवनचक्क्यांचे जाळे उभे होण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पवनऊर्जा प्रकल्पाकामी घडामोडी सुरूच आहेत. जमिनींचे दलाल, गुंडांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. यात खाकी वर्दीवाल्यांनी देखील ‘न भूतो न भविष्यती’अशा पद्धतीचा अतिरेक केला. यामुळे मोरणा भागातील बळीराजा चांगलाच भरडला गेला. नुसता भरडला नाही, तर खंडणीचे खोटे गुन्हे, मारहाण, नुकसान केले अशा गंभीर आरोपाखाली अनेक गावांतील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाला असल्याचे आरोप होत आहेत. गोकुळतर्फ पाटण, आंबेघरतर्फ मरळी, काहीर, कळकेवाडी, वाहे, दिक्षी आटोली, पाचगणी, कोकिसरे, गवळीनगर, पळशी, पाणेरी अशा सुमारे २५ गावांतील शेतकरी व महिला दररोज पाटणला हेलपाटे घालताना दिसत आहेत. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असलेले शेतकऱ्यांचे चेहरे पाहून त्या पवनचक्की कंपन्यांच्या अन्यायाची चीड नागरिकांना आल्याशिवाय राहत नाही. नेहमी सत्याचा विजय होतोच; पण ती वेळ येईपर्यंत हेलपाटे घालून बेजार होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)म्हणे पवनचक्कीची केस मोरणा परिसरातील शेतकरी जर पाटणमध्ये दिसला आणि त्याला विचारले की, पाटणला काय काम आहे तर सर्रास सांगितले जाते की, पवनचक्कीची केस आहे. पवनचक्की संदर्भातील गुन्ह्यांची संख्या काढली तर ती जवळपास शेकडोच्या घरात जाईल.कंपन्यांचे प्रतिनिधी संपर्कहीन ज्या शेतकऱ्यांना बोगस चेक दिले, अशांच्या तक्रारी आहेत. तसेच जमिनींचे वाद आहेत. काहींना अजून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींचा शोध घेताना शेतकरी बेजार झाला आहे. कुणी हैद्राबादला तर कुणी आंध्रप्रदेशात गेल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनी पाटण, कऱ्हाड येथील कार्यालये बदलल्यामुळे प्रतिनिधींना कुठे शोधायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आमदारांनी हस्तक्षेप करावा..आमदार शंभूराज देसाई यांना शेतकऱ्यांवरील जुलूम व पवनचक्की प्रशासनाची अरेरावी चांगली ज्ञात आहे. त्याबाबत आमदारांना चीड आहे. मग आता पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आमदारांनीच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी होत आहे.