शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
3
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
4
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
5
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
6
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
7
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
8
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
9
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
10
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
11
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
12
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
13
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
14
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
15
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
16
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
17
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
18
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
19
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
20
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!

पावसाच्या ‘खोखो’मुळे शेतकरी संभ्रमात

By admin | Updated: July 28, 2015 23:11 IST

पिके धोक्यात : अजूनही हवाय दमदार पाऊस

महाबळेश्वर : सर्वाधिक पावसाचे व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे पर्यटक सुखावले असून, या अल्हाददायक वातावरणाची मजा लुटण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरत दाखल होत आहे. पर्यटक भर पावसातही नौकाविहाराबरोबरच घोडसवारीची मजा लुटत आहेत.महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. बारमाही हंगाम असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या जरी मंदावत असली तरी हौशी पर्यटकांची पावसाची मजा लुटण्यासाठी महाबळेश्वरात रेलचेल सुरू असते. यंदाही महाबळेश्वरसह पाचगणीत पर्यटक दाखल झाले असून, पर्यटक विविध पॉइंटला भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. भर पावसात घोड्यांवर रपेट मारण्याबरोबरच पर्यटक वेण्णा तलावात नौकाविहार करतानाही दिसून येत आहेत.येथील लिंगमळा, अंबेनळी घाटात असणारा मेटतळे धबधबा पर्यटकांना आकर्षिक करीत असून, पर्यटक हा जलप्रपात पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. काही अतिउत्साही पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेत असताना पॉर्इंटच्या कडेला जाऊन उभे राहणे , पाण्यात जाऊन खेळणे, दंगामस्ती करेण आदी प्रकार करत आहेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)कणसांना मागणी वाढली महाबळेश्वरात इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात कणसांना मोठी मागणी असते. पाऊस अन् दाट धुके अशा वातावरणात पर्यटक वाफाळलेल्या गरमागरम कणसांना पसंती देतात. येथील विविध पॉइंट तसेच मुख्य बाजारपेठेत कणीस विक्रेत्यांची संख्या अधिक असून, सुगीचे दिवस आल्याने विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटकांमधून स्वीट कॉर्न या कणसाला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.