शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

शेतकऱ्याची मुले दत्तक; उचलला शिक्षणाचा भार

By admin | Updated: August 20, 2016 22:09 IST

शिवसैनिकांची सामाजिक बांधिलकी : दहीहंडी उत्सव रद्द करून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत

पुसेगाव : कर्जाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या खटाव तालुक्यातील मांजरवाडी येथील शेतकऱ्याच्या निराधार कुटुंबीयांना शिवसेनेने यंदाचा दहीहंडी कार्यक्रम रद्द करून आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच शेतकऱ्याच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. खटाव तालुका शिवसेनेचा हा उपक्रम अन्य राजकीय संघटना तसेच विविध उत्सव साजरे करणाऱ्या विविध तरुण मंडाळांसाठीही प्रेरणादायी आहे.गेली दोन वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे जेरीस आलेल्या मांजरवाडी येथील दत्तात्रय काशिनाथ भोसले या शेतकऱ्याने ९ मे २०१६ रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. पतीच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याची पत्नी, दोन मुलांसह अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. या कुटुंबाला अर्थसाह्य मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे मदतीची लेखी विनंती केली होती. पण, याबाबत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सध्या हे कुटुंबीय अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे खटाव तालुका प्रमुख प्रताप जाधव तसेच अंकुशराव पाचांगणे, विनोद कदम, रणजित पवार, सुमित्रा शेडगे, महिपतराव डंगारे, सूरज जाधव, वैभव जाधव, अमित म्हात्रे व दिनेश देवकर यांनी मांजरवाडी येथे जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. तसेच गोकुळाष्टमीला शिवसेनेतर्फे पुसेगाव येथे दरवर्षी दहीहंडीचा मोठा कार्यक्रम आयोजित करून हंडी फोडणाऱ्या मंडळांना मोठी बक्षिसे दिली जातात. पण, या कुटुंबाची स्थिती पाहून यावर्षीचा २५ आॅक्टोबरला आयोजित केलेला दहीहंडीचा उपक्रम साजरा न करता त्यासाठी जमलेली सर्व रक्कम या कुटुंबाला अर्थसाह्य म्हणून देण्याचा निर्णय प्रताप जाधव यांनी जाहीर केला.यावेळी या शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांना शिवसेनेतर्फे शैक्षणिक साहित्य, कपडे देण्यात आले तसेच या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)