शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

मोदींच्या ट्रायलमुळे शेतकऱ्यांची फसवणूक !

By admin | Updated: June 20, 2016 00:25 IST

पृथ्वीराज चव्हाण : शेरे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन; दुष्काळ निवारणासाठी शासन अपयशी

कऱ्हाड : ‘केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या पराभवाची कारणे अनेक आहेत. अनेक वर्षांच्या सत्तेविषयी लोकांमध्ये नाराजी होती. म्हणून देशात मोदींनी ट्रायल घेतली. मोदींनी अनेक दिवास्वप्ने दाखवली. काळा पैसा प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार म्हणून सांगितले. त्याहीपेक्षा शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक या सरकारने केली आहे. त्याच बरोबरीने राहून राज्य सरकारने दुष्काळ यशस्वी न हाताळता राज्याची बेअब्रू केली आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेरे, ता. कऱ्हाड येथे बाजारकठडे तसेच मुस्लीम मशिदीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदनराव मोहिते होते. आमदार आनंदराव पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, इंद्रजित चव्हाण, आदित्य मोहिते, गजानन आवळकर, सरपंच प्रदीप गावडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. व्ही. साखरे, व्ही. एम. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सन १९९१ मध्ये मला लोकसभेच्या निवडणुकीत काहींनी उघड तर काहींनी छुपा विरोध केला. परंतु सामान्य जनतेने मला राजकारणात तेथूनच संधी दिली. त्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचू शकलो. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशाच्या बरोबरीने चालते. अशा राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची पंतप्रधानपदाशी तुलना होते, हे चुकीचे नाही.’ यावेळी आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती निकम यांनी भाषणावेळी पृथ्वीराज चव्हाण व पतंगराव कदम यांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यवधींच्या अकरा विकासकामे झाली असल्याची माहिती दिली. सलीम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) कोयना, खरेदी-विक्री संघ बुंदीच्या लाडूसारखा खाल्ला गेल्या दोन दिवसांपूर्वी कोयना दूध संघ व खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याची टिमकी प्रसारमाध्यमांमध्ये माजी आमदारांनी वाजवलेली दिसली. मात्र, बुंदीचे लाडू जसे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवल्यास त्याच्या कळ्या पडतात व त्या खाल्ल्याही जातात. अशाप्रकारे माजी आमदारांनी कोयना दूध संघ व खरेदी-विक्री संघ झाडून खाल्ला आहे, अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.