शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: August 12, 2014 23:16 IST

देविखिंडीत आज आंदोलन : सांगोल्याकडे जाणारे पाणी अडविणार

विटा : दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील सर्वाधिक जमीन संपादित झाली असतानाही शासनाने टेंभूच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील टप्पा क्र. ४ व ५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने सांगोला तालुक्यापर्यंतची टेंभूची कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर केलेल्या ९९ कोटी ४० लाख रुपये निधीतील २५ टक्के रक्कम टप्पा क्र. ४ व ५ साठी देऊन टेंभूचे पाणी तामखडी घाटमाथ्यावर सोडावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी संतप्त शेतकरी देविखिंडी (ता. खानापूर) येथील टेंभूच्या बोगद्याजवळ टेंभूचे पाणी अडवून आंदोलन करणार असल्याने पाटबंधारे विभागासह प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे.टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील एक ते दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ही योजना मूळची खानापूर तालुक्यासाठी असताना टप्प्या-टप्प्याने कामे न करता राजकीय मंडळींनी मतासाठी सांगोल्यापर्यंतची कामे एकदम हाती घेतली. त्यामुळे सर्वच ठिकाणी टेंभूची कामे अपूर्ण राहिली. खानापूर पूर्व भागाला पाणी देण्यासाठी शासनाने टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार केला; परंतु या कामाला निधीच मिळाला नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे टप्पा क्र. ४ व ५ साठी मंजूर निधीतून २५ टक्के निधी द्यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, हजारो शेतकरी एकत्रित आले आहेत. हे सर्व शेतकरी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता देविखिंडी येथे बोगद्याजवळ पाणी अडवून तीव्र आंदोलन करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (वार्ताहर)आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता विटा तहसील कार्यालयात तहसीलदार सौ. अंजली मरोड, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कनिष्ठ अभियंता खोत, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, सुभाष गायकवाड, अरुण माने, ब्रम्हदेव बागल, सुरेश जाधव, रामभाऊ देशमुखे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे मोहिते यांना चांगलेच धारेवर धरले. टप्पा क्र. ४ व ५ साठी कधी निधी देणार व कामे कधी सुरू करणार, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी बैठकीत केली; मात्र या दोन्ही टप्प्यांच्या कामासाठी आज बुधवारी आंदोलन करणारच असल्याचा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांचे मन वळविण्यात प्रशासनाला अपयश आले.