शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

शेतकऱ्याचा विळ्याने खून

By admin | Updated: August 15, 2016 00:45 IST

आंबेदरे येथील घटना : संशयित पोलिसांच्या ताब्यात

सातारा : बांधावर म्हैस चारण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून सातारा तालुक्यातील आंबेदरे येथील ज्ञानदेव गोपाळ मोरे (वय ६५) यांचा गावातील संशयित रमेश बाजीराव मोरे (४५) याने विळ्याने वार करून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी रमेश मोरेला रात्री उशिरा ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानदेव मोरे आणि संशयित आरोपी रमेश मोरे हे शेजारी राहतात. त्यांच्या घराशेजारीच शेतीचा बांध आहे. या बांधावरून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता. शनिवारी दुपारी ज्ञानदेव मोरे हे त्यांची म्हैस चारण्यासाठी घराजवळच असणाऱ्या शेतात गेले होते. दुसऱ्या दिवशीही त्यांनी त्याच ठिकाणी म्हैस चारण्यासाठी नेली होती. याची माहिती रमेश मोरेला समजल्यानंतर तो ज्ञानेदव मोरेंना ‘माझ्या शेतात म्हैस का चारताय,’ असे विचारण्यासाठी गेला. यावेळी ज्ञानदेव मोरे यांनी ‘माझ्या शेतातच म्हैस चारतोय, तुला काय करायचे ते कर,’ असे त्याला सांगितले. त्यावर रमेश मोरे याने ‘तुला मारीन,’ अशी तंबी दिली. ज्ञानदेव मोरेंनी ‘ये बघू काय करतोयस,’ असे म्हटल्यावर रमेश मोरेने हातातील विळ्याने त्यांच्यावर सपासप तीन वार केले. त्यापैकी दोन वार त्यांच्या डाव्या पायावर केले. वार वर्मी लागल्याने त्यांच्या पायाची रक्तवाहिनी तुटली. ज्ञानदेव मोरे जागीच कोसळले. हा प्रकार घडला तेव्हा आंबेदरे गावात कोणीच नव्हते. भांगलणीच्या कामासाठी लोक शेतात गेले होते. सुमारे अर्धा तास ते जागेवरच पडून होते. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले. शेतात गेलेल्या लोकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोरे यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानदेव मोरे यांचा खून केल्यानंतर संशयित रमेश मोरे हा तेथून दुचाकीवरून पसार झाला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलिसांनी शोध मोहीम राबवून काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)