शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी खंडाळ्याचा; कर्जमाफी नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:07 IST

मुराद पटेल।लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती ...

मुराद पटेल।लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यापासून अनेक प्रकारची बंधने घातलेले परिपत्रक जाहीर केल्यानंतर शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामध्येच शासनाने योजनेचे खरे लाभार्थी मिळावेत, यासाठी शेतकºयांची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन भरण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेटच्या सुविधा आहे. त्याठिकाणी शेतकºयांनी धाव घेत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागले. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या योजनेला सोसायटीसह बँकांनी हरताळ फासत आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून हात झटकल्याने तसेच शासनाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था गावांमधून अर्ज भरण्यासाठी निर्माण न केल्याने शेतकºयांवर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यामध्येच गेल्या दोन दिवसांपासून खंडाळा तालुक्यातील इंटरनेट सेवेसह शासनाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरणाºया महा ई सेवा केंद्र, सेतू, सायबर कॅफे यामध्ये शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बसावे लागत आहे. संबंधित कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरताना कर्जमाफी संदर्भातील माहिती भरल्यानंतर प्रिंट मारताना खंडाळा तालुक्यातील बबन सीताराम ढमाळ या शेतकºयाची माहिती ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चापडगाव या गावातील दत्तू चौधरी या शेतकºयाच्या नावावर निघाली. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.‘पीकविमा‘च्या वेबसाईटचाही गोंधळ...शासनाने पीकविमा भरण्यासाठी अनेक निकष लावत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबिवली. मात्र, हे करीत असताना शासनाच्या पीकविम्याच्या वेबसाईटचे तीन तेरा वाजत आहेत. वेबसाईट सतत डाऊन राहिल्याने व शासनाने दिलेली मुदतही संपल्याने खंडाळा तालुक्यातील अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.कर्जमाफी संदर्भातील अनेक प्रकरणे खंडाळा तालुक्यातील अर्ज भरणाºया केंद्रावर निर्माण झाल्याने संबंधितांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्याची मोहीम स्थगित केली आहे. यामुळे तालुक्यातील कानाकोपºयातून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसत रिकाम्या हाताने परत घराकडे परतावे लागले. कर्जमाफी योजनेच्या संदर्भात शेतकºयांवर नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.