शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

शेतकरी देशोधडीला.. हीच समाजसेवा !

By admin | Updated: December 23, 2016 23:08 IST

शिवेंद्रसिंहराजे : उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार पलटवार; टोलनाक्यावरील लुटीबाबत मौन का ?

सातारा : ‘आता तुम्हाला समाजसेवक झाल्याचा साक्षात्कार झाला. तुम्ही समाजसेवक आहात हे ठीक आहे. पण, नेमकी काय समाजसेवा केली हे एकदा सातारकरांना कळू द्या,’ असे आव्हान देत ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’ अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पलटवार केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘एखाद्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळले तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मी कार्यक्रमाला येऊ अथवा न येऊ, मी महाराज आहे. माझे नाव पत्रिकेत पाहिजेच, असे अनेक दबावतंत्राचे किस्से साताऱ्याने बघितलेत. राजमाता सुमित्राराजे यांनीच सातारकरांशी राजघराण्याचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत केले. मीच एकटा महाराज हे वधविण्यासाठी उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्रींनी थेट तेरावे वंशज हा शब्द हुडकून काढला.’‘खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकारण घराणे, महाराज आणि दहशत यावरच अवलंबून असते, हे सर्वश्रूत आहे. भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजवणाऱ्या उदयनराजेंना जिल्ह्यातील टोल नाक्यावर सामान्य जनतेची सुरू असलेली लूट दिसत नाही. या लुटीबाबत समाजसेवक उदयनराजे एक अवाक्षरही काढत नाहीत. आजवर खूप झाले. यापुढे मात्र दहशत आणि दबावतंत्राचे राजकरण करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटाच्या पोट निवडणुकीत कोणी दबावतंत्राचा वापर केला? उमदेवारी भरण्यासाठी आलेल्या बाळासाहेब लोहार यांना मारहाण करून त्यांचे अपहरण कोणत्या समाजसेवकाने केले? लोकशाही मार्गाने आणि मोकळ्या वातावरणात का निवडणूक होऊ दिली नाही, याचे उत्तर खासदारांकडे आहे का? नगर विकास आघाडीला पालिकेच्या कारभारात सामावून घेण्यापेक्षा सातारा विकास आघाडीला स्वच्छ, पारदर्शक आणि दबावविरहित कारभार करण्याची मुभा आणि समज द्या, असेही पत्रकात म्हटले आहे. सातारा शहर आणि सातारकरांच्या विकासासाठी होणाऱ्या सकारात्मक कारभाराला नगर विकास आघाडीचा नेहमीच पाठिंबा राहील. सातारकरांच्या हिताला बाधा पोहोचत असेल तर नगर विकास आघाडीचे बारा नगरसेवक कडाडून विरोध करतील, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला. (प्रतिनिधी)...तर जमिनीवरील शिक्के हटवणार का? ‘महसूलमंत्री असताना खासदारांनी जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यांतील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:चे आणि मातोश्रींचे नाव चढवले. कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारले आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. हीच का तुमची समाजसेवा?, असा परखड सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. तुम्ही खरंच समाजसेवक असाल, तुम्हाला खरंच समाजसेवा करायची असेल तर शेतकऱ्यांच्या सातबारावरील शिक्के उठवून त्यांना मालक करा. तुमच्यासाठी यापेक्षा दुसरी मोठी समाजसेवा ठरणार नाही,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे. ४०-० चं झालं काय?‘रंजना रावत नगराध्यक्ष असताना तुमच्या आघाडीचे ३७ नगरसेवक होते. त्यावेळी आमच्या आघाडीचे केवळ दोनच नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत तुमच्या आघाडीची ३७ वरून १८ अशी घसरगुंडी झाली. आमचे दोनवरून १९ नगरसेवक झाले. याचा विसर खासदारांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४०-० करणारच अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष निकाल काय लागला, हे सर्वांनाच माहीत आहे. या वल्गनेचे पुढे काय झाले?,’ असाही सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.