शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्याला धमकी

By admin | Updated: December 17, 2014 23:00 IST

ढेबेवाडी पोलिसांत फिर्याद : रस्त्याचे काम बंद पाडल्याचे कारण

सणबूर : जिंती-मोडकवाडी, ता़ पाटण रस्त्याच्या बांधकामाचा ठेका घेतलेला ठेकेदार फोनवरून धमक्या शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद रमेश श्रीपती साळुंखे-पाटील यांनी ढेबेवाडी पोलिसांत दिली आहे़ या घटनेची माहिती अशी की, जिंतीकडून मोडकवाडीकडे जाणारा रस्ता एक एकर क्षेत्रातून रमेश साळुंखे यांच्या शेतातून जात आहे़ या रस्त्यासंदर्भात जमीन मालकाशी कोणतीही चर्चा न करता सुरुवातीच्या ठेकेदाराने जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू केले होते़ त्यावेळी रमेश साळुंखे यांनी न्यायालयात धाव घेऊन रस्त्याचे काम न्यायालयाच्या आदेशाने बंद पाडले. या रस्त्याबाबत निकाल रमेश साळुंखे यांच्या बाजूने लागला आहे़ त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, सध्या या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने संबंधित शेतमालकाशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मोबाईलवर सतत धमक्या देत आहे़ ‘तू रस्ता आडवून दाखव तुला ठार करतो. माझा वरपर्यंत वशिला आहे़ तुला सोडणार नाही,’ अशी धमकी संबंधित ठेकेदाराकडून दिली जात आहे. ‘रस्त्याबाबत मी पाटण व कऱ्हाड न्यायालयात दावा दाखल केला होता़ या दोन्ही दाव्यांचा निकाल माझ्या बाजूनेच लागलेला असताना देखील मला दमदाटी करून रस्त्याचे काम चालू करण्याचे उद्योग सुरू आहेत़ हा रस्ता व्हावा, अशी माझी अपेक्षा होती़ मात्र गावातील पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातील कोणाशी चर्चा केली नाही किंवा बोललेही नाही़ केवळ दबाव टाकून रस्ता करण्याचा त्यांचा हेतू आहे़ संबंधित जमिनीबाबत न्यायालयात माझा वेळ-पैैसा गेल्याने यापुढे मी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता माझ्या शेतातून रस्ता जाऊ देणार नाही,’ अशी तक्रार साळुंखे यांनी पोलिसांत दिली आहे. (वार्ताहर)