शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

लबाड पालकमंत्र्यांचा निधी उल्लू बनवितोय!

By admin | Updated: October 24, 2015 00:56 IST

जयकुमार गोरे : विजय शिवतारेंवर हल्लाबोल; जिहे-कटापूर योजना पूर्ण करू म्हणणाऱ्यांकडून निधीची माहिती खोटी

सातारा : ‘जिल्ह्याचे पालकमंत्री लढवय्ये आहेत. त्यांनी पुरंदरला पाणी आणले. वर्षापूर्वी तर त्यांनी वर्षभरात माण-खटाव तालुक्यांला जिहे-कटापूर योजनेचे पाणी पोहोचविणार, अशी घोषणा केली होती. आता तर ते या योजनेसाठी निधी मंजूर केला म्हणून सांगत आहेत. सध्याचे पालकमंत्री हे प्रत्येक गोष्ट चुकीची व खोटी सांगत आहेत. हे पालकमंत्री म्हणजे लोकांना उल्लू बनविणारे आणि लबाड आहेत, असा पालकमंत्री जिल्ह्याला कधीच मिळाला नव्हता,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सध्या गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेतील माहिती घेत आहे. येथून पुढे बँकेतील प्रत्येक बैठकीनंतर याविषयी पत्रकारांशी बोलू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेसाठी ६२ कोटंचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांच्यावर हल्लाबोल करतानाच चौफेर टीकाही केली. आमदार गोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी वर्षभरापूर्वी जिहे-कटापूर योजना पूर्ण करू, असे सांगितले होते. पण, अधिकाऱ्यांच्या मतानुसार या योजनेला अत्यल्प निधी मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी मी १०४ कोटींच्या निधीची तरतूद करून आणली होती. तर गेल्या १६ वर्षांत या योजनेवर ८२ कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या साडेतीन वर्षांत २९८ कोटी रुपये खर्ची घातले. सध्या या योजनेसाठी पालकमंत्री निधी मंजूर झाला आहे, असे सांगत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. कारण, महामंडळाकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामधून निधी देण्यात आलेला आहे. खरेतर पालकमंत्री हे लोकांना उल्लू बनवत आहेत, असे लबाड पालकमंत्री मी प्रथमच पाहत आहे. यापूर्वीचे दोन पालकमंत्री असेच या योजनेसाठी आश्वासन देऊन गेले. एकाने तर या पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी देता येणार नाही, असे सांगितले होते. सध्याच्या पालकमंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी लबाडी करू नये. ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू,’ असा सल्लाही आमदार गोरे यांनी दिला. (प्रतिनिधी) जयकुमार गोरे म्हणाले....मुख्यमंत्र्यांना शेती, सिंचन योजनेचे काहीच कळत नाही पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊ नये, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आठ दिवसांतून एकदा यावे राजकारण न करता पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील घोषणा पूर्ण करावी मागचं सरकार शहाणं नव्हतं, तुम्ही शहाणे आहात तर काय करणार, ते सांगा. माणमधील सर्व नेते मोडीत...या पत्रकार परिषदेदरम्यान, माण तालुक्यातील राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केले. माणमधील सर्व नेते मोडीत निघाले आहेत. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे येत आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. ‘रासप’ कुठे आहे, ते माहीत नाही. हळूहळू सर्व संपतील, असा आशावाद आमदार गोरे यांनी व्यक्त केला.