शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

नगरपंचायत निवडणूक : प्रचारात कॉँग्रेस, भाजपाची आघाडी; सेना राष्ट्रवादीत संभ्रमावस्था

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असून, नगरपंचायत निर्मितीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. दरम्यान, लोणंद नगरपंचायतीच्या प्रचारामध्ये काँग्रेस, भाजप यांनी आघाडी घेतली असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संभ्रमावस्था दिसून येत आहे. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सतरा प्रभागांतून काँग्रेस व भाजप उमेदवार निश्चित झाले असताना व प्रचाराचा शुभारंभ करत जोरदार शक्तीप्रदर्शन होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने कडून उमेदवारी निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. काँग्रेसकडून लोणंद नगरपंचायत निर्मितीवरून सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार शरसंधान सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसने लोणंद नगरपंचायत निर्मितीसाठी केलेली अडवणूक बाबतच्या स्थायी समितीचा ठरावाच्या व उच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रती वितरण करत प्रचाराचा मुद्दा बनवत रान उठवत राष्ट्रवादी यांना खिंडीत गाठले आहे. काँग्रेसकडून लोणंदकरांच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या २४ बाय ७ या पिण्याच्या पाण्याचा जागेचा प्रश्न राष्ट्रवादीला सोडवता आला नसल्याचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युतर दिले जात आहे. (वार्ताहर)